Cheetah : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याविषयी एक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी एक मादी चित्ता गर्भवती असल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशासाठी ही आनंदवार्ता मानण्यात येत आहे.
मात्र, याबाबत अजून कुठलीही स्पष्टता आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ चित्ते आणण्यात आले होते. त्यापैकी एका मादी चित्त्याचे पंतप्रधान मोदींनी आशा असे नाव ठेवले होते.
हीच आशा नावाची मादी चित्ता आता गर्भवती असल्याचे संकेत मिळाले आहेत. या चित्त्याच्या शरीरातील काही बदलांमुळे ती गर्भवती असल्याची शक्यता कुनो नॅशनल पार्कमध्ये एका अधिकाऱ्याने वर्तवली आहे. परंतु, याबाबत अजून कुठलीच खात्री देण्यात आलेली नाही.
त्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. चित्ता संवर्धन फंडचे अधिकारी लॉरी मार्कर यांनी आशा मादी चित्ता आधी जंगलात असल्याने गर्भवती असू शकते, असे सांगितले आहे. तसेच ती खरंच गर्भवती असल्यास तिची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. त्यासाठी तिला शांत वातावरण द्यावे लागेल आणि तिच्या खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था करावी लागेल, असेही ते म्हणाले आहेत.
१९५२ मध्ये भारतातून चित्ता नावाचा प्राणी नामशेष झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये सुप्रीम कोर्टाने भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. आता यावर्षी जवळपास ७० वर्षांनी भारतात चित्ते आणण्यात आले आहेत. त्यांना आणण्यासाठी ९० ते ९२ कोटी खर्च केले असल्याचे सांगण्यात येत होते.
तसेच पुढील पाच वर्षात आणखी ५० चित्ते भारतात आणण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचेही सांगण्यात आले आहे. यातच सरकारच्या निर्णयाला आता यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे. आशा गर्भवती असल्यास भारतातील चित्त्यांची संख्या आणखी वाढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
Cheetah : २५० दरोडे आणि ७० खून करणारा डाकू बनला ’चित्ता मित्र’; उचलला चित्त्यांच्या सुरक्षेचा विडा
भारतात आणलेल्या परदेशी चित्त्यांना या भयंकर गोष्टींपासून धोका, तज्ञांनी व्यक्त केली चिंता
pm narendra modi : “नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय”, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
Jayant patil : चित्त्याला खाण्यासाठी जिवंत काळवीट देणं ही.., चित्त्याच्या आहारावरून जयंत पाटलांनी साधला भाजपवर निशाणा