Share

Raj thackeray : “जेव्हा जेव्हा अशी कीड तयार होईल तेव्हा…” अमित शाहांना टॅग करत राज ठाकरेंची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना चर्चेत आली आहे. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला आहे. त्यावर आता देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत अमित शहा यांचं अभिनंदन देखील केलं आहे.

PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने घालण्यात आलेली बंदी योग्य असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट केले आहे, यामध्ये त्यांनी अमित शहा यांना टॅग केलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली, ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन, असे ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी एनआयए तसंच ईडी अशा काही तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या लोकांच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे.

तसेच चौकशीच्या दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  त्यानंतर आता या तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे केलेल्या शिफारसीनुसार गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घातली आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now