eknath shinde : अखेर शिंदे ठाकरे एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार ठाकरे कुटुंबियांतील ‘ही’ व्यक्ती

eknath shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी विश्वासू मानले जातं होते. मात्र अलीकडेच शिंदे यांनी केलेला बंड शिवसेनेत फुट पडणारा ठरला..! शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. आता एकमेकांचे सख्खे असलेले शिवसैनिक एकमेकांचे विरोधक बनले आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाची ठिणगी पडली आहे. सत्तांतर होऊन 2 महिन्याचा कालावधी होऊन गेला असला तरी देखील शिंदे आणि ठाकरे अद्याप एकत्र आलेले नाहीये. याउलट शिंदे आणि ठाकरे एकमेकांवर टीका करतं आहेत.

शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याची आता चिन्ह दिसू लागले आहे. हे सांगण्यामागील कारण म्हणजे, ठाकरे कुटुंबियातील एक व्यक्ती शिंदेच्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता पुन्हा ठाकरे आणि शिंदे एकत्र पाहायला मिळणार असल्याचं बोललं जातं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे जाणार, असल्याचं बोललं जातं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उद्या ठाण्यातील जय आंबे नवरात्रोत्सवाला रश्मी ठाकरे भेट देणार आहे.

तसेच शिंदे यांची मानाची देवी अशी ठाण्यातील टेंभी नाका जय आंबे देवीची ओळख आहे. तर आता याच देवीच्या दरबारात आपल्याला राजकीय गोष्ट पाहायला मिळणार आहे. रश्मि ठाकरे यांच्या बरोबर आणखी कोण जाणार आहे का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसाठी मवाळ भाषा वापरली होती. ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात,’ असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मैत्रीचा दाखल देत मनोमिलन करण्याची तयारी दाखवली होती. मात्र उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक उत्तर आल नाही.