Street food : रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानात, स्टॉलवर मिळणाऱ्या चमचमीत, टेस्टी पदार्थांवर ताव मारणे, हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. स्ट्रीट फूडवर तरुणाईचा तडाखाच असतो. अनेकांना स्ट्रीट फूड खायची सवय देखील लागते. मात्र स्ट्रीट फूड चवीने खाणाऱ्या खाद्यप्रेमींना चक्रावून टाकणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय.
स्ट्रीट फूडबाबतीत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस अन्नपदार्थ बनवायला लागणाऱ्या झाऱ्याने चक्क पाठ खाजवताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून स्ट्रीट फूड लव्हर्सची झोपच उडाली.
आपण अगदी आवडीने पाणीपुरी, भेळ, जिलेबी, वडापाव, समोसे या पदार्थांची चव चाखायला जातो. मात्र हे पदार्थ ज्या स्टॉलवर, टपरीवर बनतात, तिथे स्वच्छतेची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे का? हे पाहतोच असे नाही. स्वच्छतेच्या बाबतीत काही फूड स्टॉल अपवाद असतील.
मात्र मागील काळात अशा स्टॉलवर, टपऱ्यांवर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. स्वच्छतेची योग्य ती काळजी या ठिकाणी घेतली जात नाही. हेच या व्हिडिओतून समोर आले. या गोष्टीची पुन्हा आठवण करून देणारा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
त्या व्हिडिओमध्ये स्ट्रीट फूड बनवणारा माणूस इतर व्यक्तींसमोरच झाऱ्याने आपली पाठ खाजवत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे स्ट्रीट फूड खाणाऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच यानंतर बाहेर स्ट्रीट फूड खायला जाण्याआधी विचार करतील, असे दिसते.
अधिक माहितीनुसार, अब्दुल रहमान या व्यक्तीने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला काही वेळातच तब्बल ८६ हजारहून अधिक लोकांनी पाहिले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून युजर्सकडून उलट- सुलट कमेंट्स करत आहेत. मात्र स्ट्रीट फूड खाणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून धास्तीच घेतली असेल.
महत्वाच्या बातम्या-
eknath shinde : अखेर शिंदे ठाकरे एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार ठाकरे कुटुंबियांतील ‘ही’ व्यक्ती
Raj thackeray : “जेव्हा जेव्हा अशी कीड तयार होईल तेव्हा…” अमित शाहांना टॅग करत राज ठाकरेंची प्रतिक्रिया
Eknath khadse : उद्धव ठाकरे नेमकं कुठे चुकले? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान!