Share

Neha Kakkar: तु आहेस तरी कोण असं करणारी? ए आर रेहमानने नेहा कक्करला झापलं, वाचा नेमकं प्रकरण काय

ar-rahman neha-kakkar

Neha Kakkar, Falguni Pathak, Remix Version, AR Rahman/ नेहा कक्करच्या ‘ओ सजना’ या नुकत्याच आलेल्या रिमिक्स गाण्याने पुन्हा एकदा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये चर्चेला उधाण आले आहे. फाल्गुनी पाठकच्या ‘मैने पायल है छनकाई’ या सदाबहार गाण्याचे रिमिक्स व्हर्जन बनवून नेहा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. फाल्गुनी पाठकही नेहा कक्करवर नाराज आहे. या वादात काही गायकांनी फाल्गुनीला पाठिंबा दिला आहे, तर अनेकजण नेहाच्या समर्थनात उतरले आहे.

आता संगीत क्षेत्रातील दिग्गज एआर रहमान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना एआर रहमानने रिमिक्स संस्कृतीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेहा कक्करचे नाव घेतले नसले तरी त्यांचे शब्द गायिकेवर टोमणे मारणारे वाटतात. ए.आर. रहमान म्हणाले, मी हे जितके जास्त पाहतो (रिमिक्स संस्कृती), तितकेच ते विकृत होत जाते. संगीतकाराचा हेतू विकृत होतो. लोक म्हणतात, मी त्याची री-इमेजिन केली आहे. पुन्हा री-इमेजिन करणारे तुम्ही कोण? मी नेहमी दुसऱ्याच्या कामाची काळजी घेत असतो. तुम्ही इतरांच्या कामाचा आदर केला पाहिजे आणि मला वाटते की हे ग्रे क्षेत्र आहे.

https://www.instagram.com/reel/CirVjL8j4db/?utm_source=ig_web_copy_link

रहमानला एक प्रश्न विचारण्यात आला होता की संगीतकाराने निर्माता-दिग्दर्शकांकडून रिमिक्‍स किंवा मॉडर्न टच देण्यासाठी स्वतःच्‍या ट्यून रिमेक करण्‍याच्‍या विनंत्‍यांना कसे सामोरे जावे? याला उत्तर देताना रहमान म्हणाला, आमच्याकडे तेलुगू म्युझिक लाँच झाले होते आणि निर्मात्याने सांगितले कि, तुम्ही आणि मणिरत्नम यांनी ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटासाठी जी काही गाणी संगीतबद्ध केली आहेत, ती फ्रेश वाटतात.

निर्मात्यांना ती गाणी फ्रेश साउंड करतात कारण ती डिजिटली मास्टर्ड झाली आहेत. त्यात ती गुणवत्ता आधीपासूनच आहे आणि प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. म्हणून जर आपल्याला हे करायचे असेल तर आपल्याला ते पुन्हा तयार करावे लागेल. अर्थात लोक परवानगी घेतात पण तुम्ही नवीन काही करू शकत नाही म्हणून पुन्हा जुन्या गाण्यांचा रिमेक करू शकत नाही. हे विचित्र वाटतं.

ए आर रहमानच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, तो रिमिक्स संस्कृतीला पाठिंबा देत नाही. त्यापेक्षा ओरिजनल कामावर अधिक लक्ष केंद्रित करा. फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर यांच्यात या मुद्द्यावर मतभेद असू शकतात. ओरिजनल पसंद करणारे गायक आणि संगीतकार नेहमीच रिमिक्स बनवण्याच्या विरोधात असतात. होय, या रिमेक आणि रिमिक्स संस्कृतीकडे तरुण पिढीचा कल नक्कीच आहे.

हा संपूर्ण वाद 90 च्या दशकातील ‘मैने पायल है छनकाई’ या आयकॉनिक गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनचा आहे. जे नेहा कक्करने गायले आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून नेहावर टीका होत आहे. फाल्गुनीचे हे सुंदर गाणे नेहाने खराब केल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. फाल्गुनीनेही नेहाची खिल्ली उडवली आणि गाणे ऐकून तिला उलट्या होत असल्याचे सांगितले. नेहाने देखील द्वेषपूर्ण टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केले आणि तिच्या चाहत्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानले.

महत्वाच्या बातम्या-
जेव्हा नेहा कक्करचे गाणे ऐकून अनु मलिकने स्वत:लाच मारली होती कानाखाली, वाचा किस्सा
VIDEO: ११ वर्षांच्या मुलाचा मंत्रमुग्ध आवाज ऐकून नेहा कक्कर ढसाढसा रडली; म्हणाली, मी हे गाणे..
Indian Idol 13 : ‘तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’, नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकच्या ‘त्या’ कृतीवर भडकले नेटकरी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now