uddhav thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतं आहे. या प्रकरणाची दखल खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली असून सध्या या प्रकरणाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील संतोष बांगर यांच्या समर्थकांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे.
नुकतच शिवसैनिकांनी बांगर यांच्या गाडीवर हल्ला केल्याने वातावरण तापलं. अशातच आता बांगर यांच्या बद्दलची माहिती समोर येतं आहे. युवासेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील यांना आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी फोनवरुन धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची दाखल थेट उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी वेळात वेळ काढून पौळ यांना धीर देण्यासाठी फोन केला. याबाबत सांगताना पौळ म्हणाल्या, ‘अतिधाडस न करण्याचा सल्ला ठाकरेंनी दिला. मला रणरागिणीला गमवायचं नाहीये, असंही ठाकरे म्हणाले.
पौळ यांनी ट्विट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये पौळ म्हणतात की, “11 वाजता गद्दार आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाचा फोन अन बातमी पोहोचली ती कुटुंबप्रमुख आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत मग काय 12 वाजून 16 मिनिटांनी साहेबांचा फोन आला”.
https://twitter.com/PoulAyodhya/status/1574693886752358401?s=20&t=H7N3uAiT6R137tvR4qhjeQ
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर ठाकरे गट आणि बांगर यांच्यात वादाची ठिणगी पडली. या हल्ल्यानंतर शिवसेना आणि बांगर यांच्यात जोरदार आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यातील अंजनगावं सुर्जी नेहरू चौक येथे संतोष बांगर यांचा ताफा अडवून बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. शिवसैनिकांनी केलेल्या या हल्ल्यात बांगर यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Archana Puran : मी अक्षरक्ष: तडफडते आहे, फसवणूक झाल्यासारखं वाटतंय, अर्चना पूरण सिंगने व्यक्त केलं मनातील दुख
Ekta Kapoor: …तर मी आज पत्नी असते, टॉपच्या अभिनेत्यासोबत जुना फोटो शेअर करत एकता कपूरने व्यक्त केलं दु:ख
Shivsena : कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया; निवडणूक आयोग केंद्राच्या अखत्यारित असल्याने पुढे काय होणार ते स्पष्ट..