supreme court : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू आहे. विद्यमान सरकारचे भवितव्य ठरवणारा हा निकाल असणार आहे. तसेच शिवसेनेच्या अस्तित्वाची ही लढाई मानली जाते. कोर्टात सुनावणीच्या वेळी शिवसेनेच्या चिन्हाबाबत युक्तिवाद करण्यास घटनापीठाकडून पक्षकारांना सांगण्यात आले.
ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास कपिल सिब्बल यांच्यानंतर आलेल्या अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा किस पाडला. पक्षांतर बंदीबाबत सांगितलेल्या सर्व बाबींकडे यावेळी सिंघवी यांनी घटनापीठाचे लक्ष वेधले.
दहाव्या परिशिष्टानुसार एखाद्या पक्षातून बाहेर पडणाऱ्यांकरीता त्यांच्यावरील अपात्रतेची कारवाई टाळायची असेल तर विलीनीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे शिंदे गटापुढेही दुसऱ्या पक्षात विलीन होणे हा पर्याय उरतो, असे अभिषेक मनू सिंघवी यांनी घटनापीठासमोर सांगितले.
या गटाचे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण झाले तर अपात्रतेची कारवाई होत नाही. तसेच शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास निवडणूक आयोगाला बहुमताबाबत निर्णय घेता येतो. मात्र ज्या व्यक्तीची ओळखच निश्चित नाही. तिची तक्रार निवडणूक आयोग कसे काय घेऊ शकतो? हाच माझा प्रश्न आहे, असे अभिषेक सिंघवी यांच्याकडून सांगण्यात आले.
पुढे युक्तिवाद करताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, जो उद्या अपात्र ठरणार आहे. तो बहुमताचा भाग असू शकतो का? हे म्हणजे घोड्यापुढे टांगा लावण्यासारखे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या संदर्भात निकाल लागत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाने थोडी वाट पाहण्यास काय हरकत आहे, असं सिंघवी म्हणाले.
या प्रकरणातील विविध घटक, मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळे मूळ प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला तर इतर मुद्दे आपोआप निकालात निघतील, असे सिंघवी यांनी आपल्या युक्तीवादात ठोकपणे सांगितले, अशा प्रकारे वारंवार शिवसेनेच्या वकिलांकडून पक्षांतर बंदीचा मुद्दा उपस्थित करत जोरदार युक्तिवाद होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
Archana Puran : मी अक्षरक्ष: तडफडते आहे, फसवणूक झाल्यासारखं वाटतंय, अर्चना पूरण सिंगने व्यक्त केलं मनातील दुख
Ekta Kapoor: …तर मी आज पत्नी असते, टॉपच्या अभिनेत्यासोबत जुना फोटो शेअर करत एकता कपूरने व्यक्त केलं दु:ख
Shivsena : कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया; निवडणूक आयोग केंद्राच्या अखत्यारित असल्याने पुढे काय होणार ते स्पष्ट..