shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अनेक अडचणींना तोंड देतं आहेत. ठाकरेंच्या सोबत मूठभर शिवसैनिक सोबत आहेत. सोबत आहेत त्या शिवसैनिकांना सोबत घेऊन सध्या उद्धव ठाकरे अडचणींचा सामना करतं आहे. अशातच आणखी एक नकारात्मक बातमी हाती येतं आहे.
यामुळे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातून तुम्हाला 2 वर्षांसाठी तडीपार का करण्यात येऊ नये? असं पोलिसांनी या नोटीसमध्ये साळवी यांना विचारलं आहे.
साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी साळवी यांना ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांमधून २ वर्षासाठी तडीपार करण्याची नोटिस दिली आहे. ही नोटीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ५६ (१) (अब) अन्वये पोलिसांनी ही नोटिस बजावली आहे.
तसेच या नोटीसीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं स्पष्टीकरण साळवी यांनी दिलं आहे. तर आता या प्रकरणावरून शिवसैनिक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर अद्याप उद्धव ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. याचबरोबर साळवी आता काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा काय आहे नोटिसमध्ये?
‘महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, तेजश्री बिल्डिंग, एमएसईबीच्या कार्यलाजवळ, महात्मा फुले चौक, भाजप शहर कार्यालय, अहिल्याबाई चौक, लाल चौकी, खडकपाडा अशा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गुन्हे केले आहेत. आणि आता ही गुन्हे करतच आहात.
दरम्यान, तुम्ही खडपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २/२०४ महावीर नगरी टॉवर, खडपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी वास्तव्यास आहात. तुमचे गुन्हेगारीचे क्षेत्र हे महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यातील आजाबाजूचा परिसर आहे. अस नोटीसमध्ये म्हटलं आहे.