shivsena : राज्यात सत्तांतर होताच अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यात शिवसेना आमदार सुहास कांदे यांचा देखील समावेश आहे. कांदे हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. आता सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर याचबरोबर महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमनार आहे. न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. तर आता शिंदे गटाचा बीकेसी मैदानात मेळावा होणार आहे. यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. तसेच या मेळाव्यासाठी नाशिकमध्ये तयारी सुरु आहे.
शिंदे गटाची मेळाव्याच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुहास कांदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी बोलताना कांदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, हिजडे झालो होतो, म्हणून हा निर्णय घेतल’, असं खळबळजनक विधान कांदे यांनी केलं. यामुळे आता महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कांदे म्हणाले, “बाळासाहेबांची शिवसेना कुठे गेली? आता हिंदुत्व कुठे गेलं? सरकारमध्ये असताना आम्ही षंढ झालो, हिजडे झालो होतो, म्हणून हा निर्णय घेतला. जाताना विधान परिषदेला 2 आमदार आम्ही निवडून दिले, खोका तर सोडाच कुणाचाही साधा चहा देखील घेतला नाही.”
दरम्यान, ‘शिवतीर्थापेक्षा बीकेसीचं मैदान दुप्पट मोठं आहे. आपल्याला मैदान भरवायचं आहे. ठाण्यात जशी ताकद, तशीच नाशिकमध्ये ताकद आहे. पालघरमध्ये साधुंना मारलं, तेव्हा आम्हाला गप्प बसावं लागलं होतं,’ अशी खंत सुहास कांदे यांनी बोलून दाखवली आहे.