Share

Devendra fadnavis : देवेन्द्र फडणवीसांकडे अर्धा डझन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद; मुंबईची जबाबदारी कोणाच्या हातात?

तब्बल दीड महिन्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजन मंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं नाही.

दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षातील अनेक नेते गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे सरकारवर पालकमंत्र्यांवरून निशाणा साधत होती.

अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी शिंदे सरकारला पालकमंत्र्यावरून खडे बोल सुनावले होते. अखेर आज शिंदे सरकारनं पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.

माहितीनुसार, भाजपकडे २१जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलं आहे. भाजपकडे ज्या २१ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आलं आहे, तर शिंदे गटाकडे १५ जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आलं आहे.

भाजपकडे आलेले २१जिल्हे म्हणजे, मुंबई उपनगर, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, पालघर, बीड, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर,नांदेड, वर्धा, अमरावती, अकोला,भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे आले आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now