eknath shinde : सत्तांतरानंतरचा पहिलाच दसरा मेळावा राजकीय विषय बनला आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघेही आग्रही होते. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिवतीर्थावर यंदाचा दसरा मेळावा ठाकरे गटाचा होणार आहे.
यामुळे शिंदे गटात कुठतरी नाराजी आहे. आता शिंदे गटाने देखील मेळाव्यासाठी रणनीती बनवायला सुरुवात केली आहे. दसरा मेळाव्यासाठी रणनीती कशी बनवायची? याबाबत सध्या शिंदे गटात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदारांची बैठक बोलावली आहे.
शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी सांगितलं आहे की, ‘दरवर्षी शिवतीर्थावर गर्दी एकनाथ शिंदेंनी जमवली होती. आता तीच तयारी बीकेसी ग्राऊंडवर होणार आहे. नेहमीप्रमाणे तयारी सुरू आहे.’ दरवर्षी शिवाजी पार्कवर गर्दी जमवण्याचं काम शिंदेंकडे असायचं आम्हाला बीकेसीत गर्दी जमवणं काही अवघड नाही,’ असं कांदे म्हणाले.
पुढे बोलताना कांदे म्हणाले, ‘दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहरातून ३००-३५० बसेस भरून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. त्याचसोबत मनमाड येथून २ रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत.’ तसेच बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक शिंदे यांच्या सभेला गर्दी करतील,’ असा विश्वास कांदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ‘आतापर्यंत शिवाजी मैदानासाठी जी तयारी केली जात होती, अगदी तीच तयारी आता बीकेसी मैदानावर होत आहे. त्यामुळे आम्हाला हे काही नवे नाही,’ असं देखील कांदे म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच आमची भूमिका असल्याचं देखील कांदे यांनी सांगितलं आहे.
तर दुसरीकडे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा हीच आमची इच्छा होती, असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
याबाबत बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, शिवतीर्थावर ठाकरेंचा मेळावा व्हावा हीच इच्छा आमचीही होती, तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा आमच्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या. यामुळेच आम्ही ठाकरे गटाला खूप विरोध केला नाही. कारण बाळासाहेबांच स्मारक तिकडे आहे.’
Bank : बँकांची कामे आत्ताच करून घ्या; ऑक्टोबर महिन्यात बँकांना आहेत ‘या’ २१ सुट्ट्या