Bank : तुमची काही बँकांमधील कामे बाकी असतील तर, लवकरात लवकर करून घ्या. कारण येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये बँकांना खूप सुट्ट्या असणार आहेत. बँकेला सुट्टी असल्यामुळे अनेक कामांमध्ये अडथळा येतो. त्यामुळे बँकेला सुट्टी केव्हा आहे? हे आधीच माहीत असलेले बरे.. तर त्याबद्दल आपण आज जाणून घेऊ.
ऑक्टोबर महिना हा सणांचा महिना आहे. ऑक्टोबर महिन्यात फक्त ९ दिवस बँकांचे कामकाज सुरू असणार आहे. तब्बल २१ दिवस बँका बंद असणार आहेत. ईद, छटपूजा, दिवाळी, दसरा असे सर्व मोठे सण ऑक्टोबरमध्येच येत असून त्यामुळे बँकांना अधिक सुट्टी आहेत.
या सुट्ट्यांमधील काही सुट्ट्या राष्ट्रीय आहेत. तर काही सुट्ट्या स्थानिक व प्रादेशिक सुट्ट्या आहेत. अधिक सांगायचे झाल्यास, वेगवेगळ्या राज्यातील बँकांच्या स्थानिक सुट्ट्या या वेगवेगळ्या दिवशी असतात. मात्र आताच्या ऑक्टोबर महिन्याबाबत सांगायचे तर देशभरातील बँकांना राष्ट्रीय सुट्ट्या याच दरम्यान अधिक आहेत.
२ तारखेला गांधी जयंती, ५ तारखेला दसरा, २५ तारखेला लक्ष्मीपूजन, २७ ला भाऊबीज, ३१ ला छटपूजा अशा काही प्रमुख सुट्ट्या ऑक्टोबर महिन्यात बँकांना असणार आहेत. त्यामुळे अति महत्त्वाची असणारी बँकेशी संबंधित कामे नागरिकांनी लवकरात लवकर करून घ्यावीत, अन्यथा ऑक्टोबर महिन्यात बँका बंद असल्यामुळे अडचण येऊ शकते.
मात्र या काळामध्ये बँकांना सुट्ट्या असल्या तरी ग्राहक ऑनलाईन बँकिंगचा वापर करून आपली कामे करू शकतात. पण ते अधिक अडचणीचे वाटत असणाऱ्या लोकांनी बँकांची कामे आत्ताच करून घेणे अधिक सोयीस्कर असेल.
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : शिंदे गटाची तिरकी चाल! ठाकरेंचा दसरा मेळावा रोखण्यासाठी आता टाकणार ‘हा’ मोठा डाव
Bank : पुणेकरांनो… आजच पैसे काढून घ्या; उद्यापासून पुण्यातील ही बँक बंद होणार
Dussehra gathering : शिंदेंनी डाव टाकलाच होता, पण ‘या’ चूकीमुळे पलटला फासा; वाचा कोर्टात कोणता फॅक्टर ठरला गेमचेंजर