jitendra awhad : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येतं नाही, हे अगदी खरं..! राजकारणात कोण – कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. दिवसेंदिवस तर राज्यातील राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. नुकतच राज्यात सत्तांतर झालं असून शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे.
राज्यात सत्तांतर होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राजकीय धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींनी आपला मोर्चा शिंदे गटाकडे वळविला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत नेमकं काय चित्र पाहायला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर येतं आहे. स्वतःराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी गेल्याचे सांगितले जात आहे. आव्हाडांसोबत शिंदे गटातील संजय शिरसाट हे देखील शिंदेंची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
त्याचं झालं असं की, गेल्या काही दिवसांपासून शिरसाटांना विविध पदांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. अशातच अचानक आव्हाड आणि शिरसाट हे एकत्र मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र भेटी मागील कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
दरम्यान, शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे नेमकं शिरसाटांच्या मनात काय चालू आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली? असा देखील सवाल आता उपस्थित झाला आहे. परत राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याच बोललं जातं आहे.
politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Shivsena : शिंदे गटाचा खोटारडेपणा आला समोर, आठ राज्यांच्या शिवसेनाप्रमुखांची ठाकरेंच्या सभेला हजेरी
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!