Share

Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; वाईन विक्रीवरून भाजप-शिंदे गट आमने सामने, नेमकं प्रकरण काय?

Eknath Shinde Devendra Fadanvis

Eknath Shinde : सरकार बदलले की निर्णय बदलतात, धोरण बदलतात हे आता नित्याचे झाले आहे. मात्र आताच्या शिंदे सरकारने घेतलेला एक निर्णय पाहता सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. माविआ सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये होत असून त्याबाबत आता भाजप कोणती भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘मॉलमध्ये अथवा सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्यासाठी शहरातील, ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेत, आम्ही याबाबत अभ्यास करून निर्णय घेऊ.’

यावरून उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई या निर्णयाबाबत अत्यंत सकारात्मक असल्याचे दिसले. मागचा विचार करता, महाविकास आघाडी सरकारने वाईन विक्री सुपर मार्केटमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला त्यावेळी भाजपने कडाडून विरोध केला होता.

मद्य’सरकार असं म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली. वाईन विक्री सुपर मार्केटमध्ये होणं. हे भारतीय संस्कृतीत बसणारं नाही, असे ताशेरे ही ओढले. आता शिंदे- फडणवीस सरकारमधील मंत्री ठाकरे सरकारचा तो निर्णय हिताचा असल्याचे सांगत आहेत. तसेच तो पुढेही कायम ठेवण्याचे संकेत देत आहेत.

त्यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वाईन विक्रीचे धोरण रद्द करण्यात येणार आहे. असा कोणताही निर्णय आमच्या सरकारने अजून घेतलेला नाही. तसेच मी या धोरणाचा ड्राफ्ट घेऊन फडणवीसांच्या भेटीला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद असल्याचे यावरून समोर आले.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे ऐकून हा निर्णय मागे घेतात की, शंभूराज देसाई यांच्या निर्णयाला समर्थन देत, ठाकरे सरकारचा वाईन विक्रीचा तोच निर्णय पुन्हा यशस्वीरित्या राबवतात. हे येत्या काळात पहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-
Uddhav Thackeray : बाळासाहेबांचा खास माणूस उद्धव ठाकरेंच्या सेवेला; मिलिंद नार्वेकरांच्या जागी पार पाडणार महत्त्वाची भूमिका?
Eknath shinde : ..तर खपवून घेतलं जाणार नाही, दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा
Shambhuraj Desai : काहीही झालं तरी गद्दार शंभुराज देसाईंना पाडणारच; शिवसेनेच्या वाघाने फोडली डरकाळी

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now