बॉलिवूड सुपरस्टार इमरान हाश्मी(Imran Hashmi) सध्या त्याच्या अपकमिंग ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. दरम्यान, इमरान हाश्मीवर दगडफेक झाल्याच्या बातम्या येत आहेत.(stone-pelting-on-emraan-hashmi-in-jammu-and-kashmir-fir-filed-against-the-accused)
शूटिंग संपवून जेव्हा तो पहलगामच्या(Pahlgam) मुख्य बाजारपेठेत गेला तेव्हा काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे शूटिंग संपवून जेव्हा इमरान मेकर्ससोबत पहलगामच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचला तेव्हा काही अज्ञात लोकांनी इमरान हाश्मी आणि बाकीच्यांवर दगडफेक केली.
या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर(FIR) दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कलम 146, 148, 370, 336, 323 लावण्यात आले आहेत. अभिनेता त्याच्या ग्राउंड झिरो (Ground Zero) चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहलगामपूर्वी इमरान हाश्मी श्रीनगरमध्ये(Shrinagar) शूटिंग करत होता. ही बातमी समोर येताच चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. ग्राउंड झिरो या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देउस्कर करत आहेत. यामध्ये इमरानसोबत सई ताम्हणकर आणि जोया हुसैन दिसणार आहे.






