ashish shelar : नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा केला. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांनी सडकून टीका केली. त्यात शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा देखील समावेश आहे.
मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देतं दानवे यांनी अमित शहा यांना लक्ष केलं होतं. माध्यमांशी बोलताना दानवे यांनी म्हंटलं होतं की, आदिलशहा, कुतुबशहाप्रमाणे अमित शाहांनाही परत पाठवू अशा शब्दात दानवे यांनी अमित शहांवर टीका केली होती.
यावरून आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी अंबादास दानवे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. बादास दानवे यांनी बोलताना भान बाळगावे, असा खोचक सल्ला शेलार यांनी दिला आले. याबाबत शेलार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना शेलार म्हणाले, ‘अमित शहा यांच्या विषयी बोलताना जरा औकातीत बोलावं,’ असं शेलार यांनी स्पष्टच सांगितलं आहे. याचबरोबर सध्या राज्यात वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्पावरुन वाद सुरू आहे. याच मुद्यावरून सत्ताधारी – विरोधक आमनेसामने आले आहेत.
याचाच धागा पकडत शेलार यांनी दानवे यांना लक्ष केलं आहे. दानवे यांना लक्ष करताना शेलार यांनी म्हंटलं आहे की, वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्पाबद्दल आधी माहिती घ्या आणि नंतर भाष्य करा.’ वेदांता आणि फॅाक्सकॅान या प्रकल्पाची चर्चा ठाकरे सरकारच्या काळात सुरू झाली, मात्र प्रकल्प सुरू झाला नाही, असा खुलासा शेलार यांनी केला.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या तोंडावर झालेला अमित शहा यांचा मुंबई दौरा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय बनला. अमित शहा यांनी मुंबई येऊन उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला धारेवर धरले. याच मुद्यावरून भाजप – शिवसेना नेते आमनेसामने आले आहेत.
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
amruta fadnavis : “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस