Share

shinde group : राष्ट्रवादीच्या १० तालुकाध्यक्षांसह २ माजी नगरसेवक एकनाथ शिंदे गटात; थेट शरद पवारांना धक्का

sharad pawar

shinde group : राज्यात सत्तांतर झालं तसं राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडतं आहे. आमदारांपाठोपाठ, खासदार, नगरसेवकांसोबत कार्यकर्ते देखील शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. यामुळे सध्या विरोधक चिंतेत आहेत. एकनाथ शिंदे बंड केल्यापासून शिवसेनेला तर गळतीच लागली आहे.

पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. ठाकरे पिता – पुत्र अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीला देखील जबर धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा आता राष्ट्रवादीकडे वळवला आहे.  नवी मुंबईतील २ माजी नगरसेवकांसह १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी – कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून, नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिंदे गटाला समर्थन दिलं आहे. यामुळे याचा धक्का थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बसला असल्याच बोललं जातं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. याच बरोबर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिंदे यांनी ठाणे, मुंबई, नवी मुंबईत विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता विरोधकांना घाम फुटला आहे.

शिवसेनेसाठी चिंतेची बाब म्हणजे, मुंबईतही शिवसेनेचे अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. तर नवी मुंबईत अशोक गावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे सध्या विरोधकांसमोर अनेक अडचणी उभ्या निर्माण झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
Shinde Group : शिंदे गटातील मंत्री भुमरेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ; ८९० कोटींच्या योजनेचे कंत्राट जावयाला
Shivsena : शिंदेंनी शिवसेना फोडली, आता शिवसेनेने काॅंग्रेसला पाडले खिंडार; बड्या नेत्याचा सेनेत प्रवेश
Salman khan : सलमानला मारण्यासाठी बनवला होता प्लॅन-बी, फार्म हाऊसच्या मार्गावर भाड्याने घेतली होती रूम, पण…
या धडाकेबाज क्रिकेटरने थेट चीअरलीडरशीच केले लग्न, IPL च्या मैदानाच सुरू झाली लव्हस्टोरी

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now