राजकारणात कधी, काय होईल, हे सांगू शकतं नाही, हे अगदी खरं..! असं बोललं जातं की राजकारणात कोणी – कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो. यामुळे केव्हाही राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळतात. हे सांगण्याच कारण म्हणजे नुकतीच भाजप नेत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे.
यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सिल्व्हर ओकवर जातं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA Election) निवडणुकीच्या निमित्ताने आशिष शेलार यांनी पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा नेमकं काय घडलं?
राजकीय घडामोडी वेगाने घडत असतानाच भाजप नेते आशिष शेलार हे शरद पवारांच्या भेटीसाठी आज गेले. मिळालेल्या महितीनुसार, आज सकाळी शेलार हे पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक येथे आले होते. तिथे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात काही काळ चर्चा झाली.
मात्र नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती मिळालेली नाहीये. असं असलं तरी देखील मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते, त्यासाठी शेलार यांनी पवारांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसं पाहायला गेलं तर, एमसीए निवडणुकीवर गेल्या काही दशकांपासून शरद पवार यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आशिष शेलार हे 2017-18 साली एमसीएचे अध्यक्ष होते, तर शरद पवारही दोनवेळा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले. यामुळेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सोमवारी आशिष शेलार हे सिल्व्हर ओकवर जाणार होते. एवढंच नाहीतर तर शेलार हे सिल्व्हर ओक बंगल्याजवळही पोहोचले होते. पण, पवारांना न भेटता तसेच माघारी परतले होते. अखेर आज शेलारांनी पवारांची भेट घेतली. या भेटीकडे राज्याच लक्ष लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?
Raj Thackeray : मनसे – शिंदे गट महापालिका निवडणूका एकत्र लढवणार?, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक