Share

Varsha Usgaonkar : प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा ‘तो’ टॉपलेस फोटो पुन्हा चर्चेत; लोकांनी झाप झाप झापले

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे लाखो चाहते आहेत. त्या नेहमीच त्यांच्या अभिनय आणि सुंदरतेमुळे चर्चेत असतात. मात्र, आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक टॉपलेस फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे त्या आता चर्चेत आल्या आहेत.

वर्षा यांनी वयाची पन्नाशी ओलांडूली तरीही त्या चिरतरुण दिसतात. त्यांचे अजूनही लाखो चाहते आहेत. मध्यंतरी त्या त्यांच्या एका जाहिरातीमुळे त्या ट्रोल झाल्या होत्या. वर्षा यांचा हा विरोध कोळी समाजानं केला. मात्र, कोणत्या वादात अडकण्याची वर्षा यांची ही पहिलीच वेळ नाही.

याआधी देखील त्या एका फोटोशूटमुळे चर्चेच आल्या होत्या. यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यांनी एकेकाळी एका इंग्रजी मॅगझिनसाठी बोल्ड फोटोशूट केलं होतं. हे फक्त बोल्ड फोटोशूट नाही तर त्या टॉपलेस देखील झाल्या होत्या. त्यांचे हे फोटोशूट चाहत्यांच्या काही पसंतीस उतरले नव्हते.

याआधी त्या ज्या जाहिरातीमुळे चर्चेत आल्या ती जाहिरात म्हणजे, ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’ अशी होती. या जाहिरातीत वर्षा म्हणाल्या होत्या की, बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले.

याशिवाय बाजारात बऱ्याचवेळा कोळणींकडून माझी फसवणूकही झाली आहे, असे त्या म्हणाल्या. वर्षा यांची ही जाहिरात पाहिल्यानंतर त्यांचा कोळी समाजानं संताप व्यक्त केला. वर्षा यांची ही जाहिरात एका मच्छी विक्रेत्या अँपनं फेसबुकवर शेअर केली होती.

त्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. फक्त कोळी समाजान नाही तर अभिनेते जयवंत वाडकर यांनीही वर्षा आणि या जाहिरातीवर टीका केली होती. त्यामुळे सुंदरतेमुळे चर्चेत असणाऱ्या वर्षा यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेकवेळा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे असेच म्हणावे लागेल.

इतर मनोरंजन

Join WhatsApp

Join Now