Share

Congress : स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसला मिळणार मराठी पक्षाध्यक्ष? सोनिया गांधींच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सरकार स्थापन झाल्यापासून कॉंग्रेस पक्षाची मोठी वाताहत झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. अनेक बडे नेते काँग्रेस सोडून जात आहेत. अशात आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होणार अशी माहिती समोर येत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, ऑक्टोबरमध्ये काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक निर्णय घेतला आहे, ज्यांच्या निर्णयामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी नेता विराजमान होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी पक्षातून होत आहे. तर अशोक गेहलोत यांचं देखील नाव चर्चेत आहे.

मात्र आता अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र राहुल गांधी आणि गेहलोत या दोघांनी नकार दिल्यास वासनिक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. असं झाल्यास, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा विराजमान होऊ शकतो.

याआधी पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षविरोधी विधान केल्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याचं बोललं जात आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांना अध्यक्ष करण्याची शक्यता धुसर झाली आहे. मात्र नव्या घडामोडींमुळे मुकूल वासनिक यांचे नाव पुढे आले आहे.

वासनिक यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, हे तीनवेळा खासदार राहिलेले आहेत. तसेच सर्वात कमी वयात संसदेत पोहोचलेले खासदार अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान काँग्रेसची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत असून या यात्रेत राहुल साडेतीन हजार किमी प्रवास करणार आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now