एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली, आणि ठाकरे सरकार कोसळून महाराष्ट्रात शिंदे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद प्रतिवाद सुरू झाले.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार दिवसेंदिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. टीकेची ही धार आणखीनच आक्रमक होत आहे. आता मंत्री संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पैठणमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी पैठणसाठी २ हजार कोटी रुपयांचा विकासनिधी दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा नागरी सत्कार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाआधी भुमरे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर यांच्यावर टीका केली.
म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामच केलं नाही, ते भेटतच नव्हते तर काय त्यांचा सत्कार करणार. एकनाथ शिंदे यांनी काम केलं म्हणून त्यांचा नागरी सत्कार करत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटून शिंदे गटात येणार असल्याचे संकेत देखील दिले.
म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर उर्वरित १५ आमदारांपैकीही काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातो. अशातच माझ्या संपर्कात असणाऱ्या दोन आमदारांचा पैठणला नाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी प्रवेश सोहळा होईल असे भुमरे म्हणाले.
दरम्यान, सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री हे अनेक विकासकामांची घोषणा करू शकतात. पैठणमधील रस्त्यांमुळे परदेशी कंपनी परत गेली होती, त्याबद्दल दिलगिरी आहे. मात्र आता आम्ही चांगले रस्ते करतोय आणि अनेक कंपन्याही तालुक्यात येत आहेत, असंही भुमरे यांनी यावेळी म्हटलं आहे.