पुन्हा एकदा रोहित पवारांनी राम शिंदे यांना लक्ष केलं आहे. काल आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे गणपती विसर्जनाला पुण्यात आले होते. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर रोहित पवारांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राजकीय घडामोडींबाबत बोलताना रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले.
माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली . ‘राम शिंदे यांनी आजच राजीनामा द्यावा, मी सुद्धा उद्या राजीनामा देतो, प्रचाराला देखील जात नाही आणि जनतेच्या प्रेमावर निवडून येतो, असं ओपेन आव्हान पवारांनी शिंदेंना दिलं. ‘विधानपरिषद सोडून विधानसभा लढवा,’ असं आव्हान देखील पवारांनी शिंदेंना दिलं आहे.
रोहित पवारांनी केलेल्या टीकेवर अद्याप शिंदे यांनी भाष्य केलं नाहीये. मात्र पवारांनी केलेल्या टीकेवर शिंदे कसं प्रत्युत्तर देतात? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खरं तर, भाजपने विधान परिषदेवर राम शिंदे यांना पाठवून दिलं आहे. मात्र पुढील विधानसभा निवडणुकीला कर्जत-जामखेड मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात चांगलाच संपर्क वाढविला होता. मात्र रोहित पवारांनी मैदानात एंट्री घेताच राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळाली. गेल्या निवडणुकीत राम शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तर दुसरीकडे आता आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघ कोणाच्या ताब्यात जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने आतापासून कामाला सुरुवात केली. असं असतानाच राम शिंदे आणि रोहित पवारांमद्धे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असल्याच पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल