सातारच्या भोसलेंनी देखील शिंदेंना दिलं समर्थन; उद्धव ठाकरेंच्या हातून बालेकिल्ला निसटणार? ‘अशी’ बदलली राजकीय समीकरण

राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का देतं एकनाथ शिंदे यांनी थेट भाजप सोबत युती करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केलं आहे. राज्यात शिंदे गटाने आता आपलं वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरेंपुढे आव्हान आता वाढतं चालली आहे. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या मोठ्या पेचात सापडले आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे पुन्हा पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाची ताकद वाढताना पाहायला मिळतं आहे.

अशातच उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर येतं आहे. साताऱ्यातील शिवसेनेच्या युवा नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे साताऱ्यातील युवा नेते आणि युवासेवा जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले.

यामुळे आता साताऱ्यात देखील उद्धव ठाकरेंना धक्का बसला असल्याचं बोललं जातं आहे. मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी रणजित सिंहे भोसले यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत साताऱ्यात नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, साताऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोरची आव्हानं आता वाढलेली पाहायला मिळतं आहेत. आता साताऱ्यात उद्धव ठाकरे पुन्हा कशी जोमाने तयारी करणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी साताऱ्यात शिंदेंचीच हवा असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.

रणजित सिंहे भोसले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे सातारा जिल्ह्यात शिंदे गटाला आता अधिक समर्थन मिळवण्याच्या दृष्टीने बळ मिळेल, अशा विश्वास व्यक्त केला जातोय. यामुळे आगामी काळात साताऱ्यात कोणाचं वर्चस्व असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या
‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल