औरंगाबाद(Aurangabad): औरंगाबादच्या बिडकीन येथे एका प्रकल्पासाठी जागा पाहण्यासाठी चिनी उद्योगांचे पथक आले होते. पैठण रस्त्यांवरील खड्डे पाहून ते अर्ध्या रस्त्यातून परत गेले. खड्ड्यांमुळे उद्योजक परत गेल्यामुळे नागरिक येथील मंत्र्यांवर संताप व्यक्त करत आहेत. औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रखडला आहे.
बिडकीनमध्ये प्रकल्प उभारणीसाठी चीनमधील एक कंपनी गुंतवणूक करणार आहे. या सिटीच्या पहिल्या टप्प्यात शेंद्रा आणि बिडकीनमध्ये उद्योग विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये ऑरिक सिटी प्रकल्प उभा राहत आहे. दिल्ली- मुंबई कॉरिडॉर अंतर्गत ही सिटी उभारली जाणार आहे. यासाठी तब्बल १० हजार एकर जमीन लोकांकडून घेतलेली आहे.
हा प्रकल्प उभारणीसाठी चीनी अधिकाऱ्यांचे एक पथक पाहणीसाठी औरंगाबादमध्ये आले होते. ते पथक जागा पाहणीसाठी निघाले. मात्र, औरंगाबाद शहरातून पैठण रस्त्यावरून बिडकीन येथे जाण्यासाठी रस्त्यात लागलेली वाहतुकीची कोंडी आणि खड्ड्यांमुळे जमीन न पाहता अर्ध्या रस्त्यातूनच हे पथक परत गेले.
यामुळे या नव्या प्रकल्पातील मोठी गुंतवणूक शहरातील खराब रस्त्यामुळे परत जाण्याची शक्यता आहे. १२ तारखेला गणेश विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. यासाठी ते याच मार्गाने जाणार आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले.
त्याप्रमाणे त्यांना या रस्त्यावरून जाताना रस्त्यावरील खड्ड्यांचा अनुभव येईल आणि हा रस्ता दुरुस्त करण्याचा विचार ते करतील अशी आशा औरंगाबाद येथील लोकांना आहे. येथील औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा हा गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला आहे. अनेकदा उद्घाटने झाली पण रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधीही मिळाला नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय आणि राज्यातील सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, असे असतांना शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नावर काही उपाययोजना करताना दिसत नाही. औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे.
महत्वाच्या बातम्या
Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली
कॉंग्रेसला भलं मोठं भगदाड! अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार?, कॉंग्रेसच्या गोटात खळबळ
…तर मी राजीनामा देऊन टाकेन; तानाजी सावंत यांनी केलं जाहीर आव्हान, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
दसरा मेळावा कोणाचा शिंदे गट की ठाकरे गट? आठवलेंनी केला मोठा गौप्यस्फोट, सांगितलं ‘कारण’