शिवसेनेला एकप्रकारे गळतीच लागली आहे. 40 आमदारांपाठोपाठ आता खासदार, नगरसेवक, कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होताना पाहायला मिळत आहे. सध्या शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी नेत्यांची चढाओढ सुरू आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अनेक संकटांचा सामना करावा लागणार असल्याच बोललं जातं आहे.
अशातच आणखी एक बातमी उद्धव ठाकरेंना धक्का देणारी समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एक हजार कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांचाही समावेश असणार आहे.
यामुळे आता शिवसेनेसह राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला देखील मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सावंत हे नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. यानंतर मोठा पक्षप्रवेश समारंभ होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
दरम्यान, एक – दोन नव्हे तब्बल तीनशे कार्यकर्त सावंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला समर्थन देणार आहेत. तसेच, सोलापूर येथे हेरिटेज सभागृहात सुमारे सातशे ते साडेसातशे पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. यात राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.
सध्या शिवसेनेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाला पुन्हा उभारी आणण्याचे मोठे आव्हान आता उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या पुढे आहे. सध्या ठाकरे पिता – पुत्र हे जातीने मैदानात उतरले आहेत. पुन्हा एकदा शिवसेना उभी करण्यास ठाकरे पिता – पुत्र सज्ज झाले आहेत.
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..