अवघ्या तीस वर्षाच्या तरुणांने गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलाच्या मृत्यूने कुटुंबियावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. तर सणासुदीच्या काळात परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जातं आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वाचा नेमकं असं घडलं काय?
ही घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लोहगाव येतही असल्याची माहिती मिळाली आहे. गणेश सुभाष मुसळे (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. राशेजारी राहणारी महिला प्रेम संबंध ठेवून लग्न करण्यास दबाव आणत असल्याने, गणेश मुसळे यांनी हे टोकाच पाऊल उचललं असल्याच बोललं जातं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा तरुण हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसह सासुरवाडी शरनापुर येथे टायर पंक्चर दुकान चालवत होता. गणेश हा दोन तीन दिवसांपूर्वीच गणेश आई वडिलांना भेटण्यासाठी आपल्या गावी म्हणजेच लोहगावला आला होता.
दरम्यान, रात्री उशीरा घरातील एका खोलीत गणेश याने गळफास घेऊन जीवन संपवलं. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आईला मध्यरात्री जाग आली मुलाचा लटकलेला मृतदेह पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली.
आईने तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन भेत घेतली. गणेशला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गणेशला पोलिसांनी मृत घोषित केले. सध्या गणेश याच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशाच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गणेश मूसळे यास त्यांच्या शेजारी रहाणारी महिला तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवून लग्न कर व स्वतःच्या पत्नीस सोडून दे असा म्हणतं असे. यामुळेच गणेशने टोकाचे पाऊल उचलले असल्याच आता बोललं जातं आहे. सध्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.