Share

उद्धवसाहेबांनी सर्वधर्मीयांचे प्राण वाचवले, तुम्ही तर थाळ्या वाजवायला आणि दिले लावायला सांगितले

ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार झालं अन् कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला. तब्बल दोन वर्षानंतर राज्यात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी मिळू लागली. कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने यंदा कोणतेही नियम लावण्यात आलेले नाहीये. यामुळे दहीहंडी नंतर आता गणेशोत्सव देखील मोठ्या आनंदात होतं आहे.

तर आता यावरून राजकीय वर्तुळात दावे – प्रतिदावे केले जातं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांची मर्यादा होती. मात्र आता शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात नियमांचे बंधन नसल्याने सगळेच राजकीय पक्ष शक्तीप्रदर्शन करत आहेत.

भाजपने यंदा जिकडे तिकडे शिवसेना पर्यायाने उद्धव ठाकरेंना डिवचणारी बॅनरबाजी केली आहे. ‘आपलं सरकार आलं- हिंदू सणांवरचं विघ्न टळलं,’ अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. बॅनरबाजी करत भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांनी जाणून बुजून हिंदू सणांवर बंधन लादली होती, असाच रोख बॅनरबाजीतून दिसून येत आहे.

तर आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देशात लॉकडाऊन कोणी जाहीर केला?,’ असा संतप्त सवाल अरविंद सावंत यांनी भाजपला उपस्थित केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे.

अरविंद सावंत यांनी म्हंटलं आहे की, ‘देशात लॉकडाऊन कोणी जाहीर केला? थाळ्या वाजवा, दिवे लावा कोणी केलं? उद्धवसाहेबांनी सर्व धर्मीयांचे प्राण वाचवले, सण-उत्सवांना बंदी नव्हती, गर्दीला होती. निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, तो विघ्नहर्ता आहे’, असं सावंत यांनी भाजपला लक्ष करताना म्हंटलं आहे.

दरम्यान, सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. सध्या सत्ताधारी, विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अशातच भाजपकडून करण्यात आलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय बनला आहे. आता यावरून राजकारण रंगलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ गटात जुंपली! आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना झाप – झाप झापले, वाचा काय म्हंटलंय?
आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरील १०० खोक्यांबाबत खुलासा करावा; रामदास कदमांनी केली पोलखोल
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणार
थेट मुळावरच घाव! उद्धव ठाकरेंचा सर्वात जवळचा माणूस फुटणार? शिंदेंनी घरी जाऊन घेतली भेट
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now