Share

आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवरील १०० खोक्यांबाबत खुलासा करावा; रामदास कदमांनी केली पोलखोल

ramdas kadam
शिवसेनेतील दोन गटांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फुत पडली आहे. शिवसेनेतील दोन्ही गटांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा तयारीला लागले आहेत.

शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी रणनीती बनवत आहेत. राज्यात ठिकठिकाणी जाऊन आदित्य ठाकरे हे बंडखोरांना लक्ष करत आहेत. आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना गद्दार असे म्हणत आहेत. यालाच आता प्रत्युत्तर शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना कदम यांनी ठाकरे पिता – पुत्रांवर आणि सोबतच शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहे. ‘उद्धव ठाकरे हे मराठाद्वेष्टे आहेत. त्यांना मराठा माणूस मोठा झालेला आवडत नाही. त्यामुळे ते मराठा नेत्यांना संपवून टाकतात, हे मी जवळून पाहिले असल्याच कदम यांनी सांगितलं.

तसेच ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हेच गद्दार आहेत, याचे कारण असे की, मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले.’ आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या आमदारांना ५० खोके मिळाल्याचे सांगतात. मात्र मातोश्रीवर गेलेल्या १०० खोक्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत खुलासा करण्याची मागणी कदम यांनी केली.

गुलाबराव पाटलांची शिवसेनेवर टीका..!

दरम्यान, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील शिवसेनेला लक्ष करताना म्हंटलं आहे की, ‘आम्ही शिवसेनेत गेल्या ३५ वर्षांपासून काम करीत आहोत आणि ३२ वर्षांचे आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार असल्याचा शिक्का मारतात,’ असं पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे की, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका करतात, हे योग्य आहे का ? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात. मात्र, शिवसेनेच्या विचारांचे वारसदार नाहीत, अशा शब्दात पाटील यांनी लक्ष केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण थेट दिल्ली दरबारी; कॉंग्रेसच्या गोटात खळबळ, राजकीय समीकरण बदलणार

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now