शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेही आता शिंदे गटात जाणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शनासाठी भेट दिल्यामुळं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागलेली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार, नगरसेवकांनी देखील शिंदे गटाची वाट धरल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण बदलताना पहायला मिळत आहे.
अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नार्वेकर देखील शिंदे गटात सामील होणार का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
दरम्यान, विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी आद्यपही या भेटीवर काही भाष्य केले नाही. मात्र ट्विटरवर मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणरायाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. असे त्यांनी भेटीबाबत लिहले आहे. सध्या राजकीय वर्तुळात याच भेटीच्या चर्चा सुरू आहेत.
नार्वेकर आणि शिंदे यांची भेट गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने असली, तरी दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे शिंदे-नार्वेकरांनी कितीही नाकारलं, तरी दोघांमध्ये सद्य राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असणार, असं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जातं आहे.
महत्त्वाच्या बातम्या