अशातच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. अण्णा हजारे यांनी पत्रातून म्हंटलं होतं की, तुम्ही ‘स्वराज’ पुस्तकात मोठमोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या, पण त्याचा तुमच्या आचरणावर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही.’
पुढे पत्रात आण्णा हजारे यांनी म्हंटलं की, ‘केजरीवाल साहेब तुम्ही सत्तेच्या नशेत धुंद आहात, जनआंदोलनातून उदयास आलेल्या पक्षाला अशा प्रकारचं वागणं शोभत नाही, अशी जहरी टीका अण्णा हजारेंनी केजरीवाल यांच्यावर केली होती. केजरीवाल यांच्यावर टीका करणारे अण्णा हजारे आता टीकेच्या रडारवर आले आहेत.
‘भाजप अण्णा हजारे यांचा वापर करून घेतोय असा आरोप केजरीवाल यांनी केल्यानंतर आता काँग्रेस नेते उदित राज यांनी अण्णांवर अत्यंत जहरी शब्दांत टीका केली आहे. यामुळे आता या प्रकरणावरून अण्णा हजारे आणि कॉंग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याच पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कॉंग्रेस नेते उदित राज यांनी समाजद्रोही, महाधूर्त और बेईमान अशा शब्दात अण्णा हजारे यांच्यावर टीका केली. उदित राज यांनी ट्विट करत म्हंटलं आहे की, “आण्णा हजारे ही महाधूर्त व्यक्ती आहे. आण्णांनी लावलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप एक ही सिद्ध झाले नाही. लोकपालचं काय झाले?,” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
तसेच उदित राज यांनी आधीच्या ट्वीटमध्ये म्हंटलं आहे की, “आण्णा हजारे समाजसेवक नाही तर समाजद्रोही आहेत. भाजपच्या सांगण्यावरून त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळ्याचे आरोप केले होते, जे नंतर बिनबुडाचे आहेत, हे सिद्ध झाले. या बेईमान माणसाने माफी मागितली पाहीजे, अशी मागणी राज यांनी केली आहे.
बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट