BJP : नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज ठकरे हे फायटर आहे, असे म्हणत राज ठाकरेंचे कौतुक केले आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरेंचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना ते उपस्थित असतात. मीसुद्धा त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. त्यामुळे मी आज त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. तसेच आजची भेट ही सदिच्छा भेट असून त्याचा राजकीय संदर्भ काढू नये, असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “मी वारंवार सांगतो की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे, जनतेचे आणि हिंदुत्वाचे रक्षण करणारे एक अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते एक फायटर आहेत, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसात भाजप आणि मनसेच्या अनेक भेटीगाठी होताना दिसत आहेत. सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट झाली असल्याचे समोर आले होते. सोमवारी सकाळी सागर बंगल्यावर त्यांच्यात गुप्त भेट झाल्याचे समोर आले होते.
त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंवर कौतुकाचा वर्षावही केला आहे. या वाढत्या भेटीगाठींमुळे मनसे आणि भाजपमध्ये युती होणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, राज्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरूनही वाद सुरु आहे. यावर्षी शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार, याबाबत शिवसेना आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असे वक्तव्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या
Amit Shah : तुमच्या मुलाऐवजी बिगर भाजप नेत्याने ‘ते’ कृत्य केले असते तर…; अभिनेत्याचा अमित शहांना सवाल
MNS : दसरा मेळाव्यावरून शिवसेना-शिंदे गटाला मनसेने सुनावले, ट्विट करत म्हणाले,”वारसा हा वास्तूचा नसून….
Shubhaman Gill: सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल; थेट पुरावेच आले समोर
‘उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..’, शहाजीबापूंनी दिलं ओपेन चॅलेंज