Share

Shubhaman Gill: सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल; थेट पुरावेच आले समोर

shubhman gil sara ali khan

शुभमन गिल(Shubhaman Gill): भारतीय क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर ‘मॅन ऑफ द सीरिज’चा किताबही पटकावला आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी शुभमन सध्या इंग्लंडमध्ये आहे. शुभमन गिल हा सारा तेंडुलकर सोबत डेटिंग करत असल्याची चर्चा होती.

दरम्यान, सोशल मीडियावर शुभमनचा सारा तेंडुलकरसोबत नसून अभिनेत्रीसोबतचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्या फोटोवर नेटकरी मजेशीर कमेंट करत आहेत. स्टार बॅट्समन शुभमन गिलचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत नसून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसोबत आहे. तो तिच्यासोबत डिनर करताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीवरून गिल आणि सारा दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांसोबत दिसून आले होते. याबाबत सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात सेलेब्रिटींसाठी त्यांची डेटिंग लाईफ चाहत्यांपासून लपवणे कठीण झाले आहे. त्यांनी कितीही लपण्याच्या प्रयत्न केला तरी त्यांची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत येते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपली मुलगी सारा तेंडुलकरला प्रसिद्धीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, २०२० सालापासून भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबतच्या तिच्या डेटिंगच्या अफवांनी मीडियामध्ये ती चांगलीच चर्चेत आली. शुभमन गिलने आपल्या दमदार फलंदाजी आणि खेळाच्या जोरावर क्रिकेटप्रेमींच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावून सचिन तेंडुलकरचा २४ वर्षांचा जुना विक्रमही मोडला आहे. शुभमन आणि सारा तेंडुलकरच्या नात्याबद्दल नेटकरी अंदाज लावत असतानाच त्यांच्या ब्रेकअपचीही माहिती समोर आली आहे. या सगळ्यामध्ये क्रिकेटरने सारा अली खानसोबत डिनर केले आहे.

https://twitter.com/ArunTuThikHoGya/status/1564250704885448705?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1564250704885448705%7Ctwgr%5E07cabf01f127750a908457401ad4486a77f390c6%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Fshubman-gill-sara-ali-khan-dinner-date-video-and-photos-goes-viral%2Farticleshow%2F93866842.cms

महत्वाच्या बातम्या
‘उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..’, शहाजीबापूंनी दिलं ओपेन चॅलेंज
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रामदेव बाबांनी केलं मोठं व्यक्तव्य; थेट शिवसेनेच्या मुळाशी घातला घाव, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
काॅंग्रेसला आजवरचे सर्वात मोठे भगदाड; उपमुख्यमंत्र्यासह तब्बल ५१ बडे नेते राजीनामा देणार
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी शशी थरूर रणशिंग फुंकणार; महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचं नाव चर्चेत

खेळ इतर ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now