यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोघांमध्ये फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर तासभर खलबतं झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीचे संकेत दिसू लागले आहेत.
असं असतानाच आज भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील राज ठाकरेंची भेट घेणार असल्याच समजत आहे. यामुळे आता आणखीच भाजपा-मनसे युतीच्या चर्चानी जोर धरला आहे. अद्याप बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागील कारण समजले नाहीये.
काल देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. समजा, आगामी निवडणुकीत भाजपा-मनसेची युती झाली तर, याचे पडसाद कसे पडतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावर अद्याप राज ठाकरेंनी भाष्य केलेलं नाहीये.
दरम्यान, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या कालच्या भेटीचं वृत्त दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आलं आहे. भेटी मागील कारण अद्याप समोर आलेल नाहीये. मात्र निवडणुका जवळ आल्या की राजकीय समीकरण समोर येतात. यामुळे आगामी काळात मनसे – भाजप युती बद्दल चित्र स्पष्ट होईल.
विशेष बाब म्हणजे, फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. याआधी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आता राज ठाकरे-फडणवीसांच्या भेटीला पोहोचले.
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: साऊथच्या दिपीका पदुकोणने बेडरूममध्ये दिली किलर पोज, फोटो पाहून नेटकरी घायाळ
धक्कादायक; लिंगायत संतांचा दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, आंदोलन पेटलं
T.V. Star: ‘या’ अभिनेत्रीला होते सेक्सचे व्यसन, ७०० पुरूषांसोबत बनवले संबंध, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
Prime Minister: ‘तो’ शब्द ऋषी सुनक यांना पडलं महागात, पंतप्रधान शर्यतीत पडले मागे, आपल्याच पायावर मारली कुऱ्हाड