Shah Rukh Khan: ‘या’ कारणामुळे शाहरूखची उडाली घाबरगुंडी, डॉनची आयकॉनिक भूमिका साकारण्यास दिला नकार

Shah Rukh Khan, Aamir Khan, Akshay Kumar, Lal Singh Chadha/ हे वर्ष म्हणजेच 2022 बॉलीवूडसाठी चांगले नाही. 8 महिने उलटले आणि फक्त काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमत्कार करू शकले. इतकं की अनेक दिग्गजांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटले. त्याचवेळी, नुकताच प्रदर्शित झालेला आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadha) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ हे चित्रपट खूपच फ्लॉप ठरले.

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, सतत फ्लॉप होत असलेल्या चित्रपटांची अवस्था पाहून शाहरुख खानने डॉन 3 ची ऑफर नाकारली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुखला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती पण आता त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. शाहरुखला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती, पण त्याबद्दल त्याला पूर्ण विश्वास नसल्याने त्याने नकार दिल्याचे बोलले जात आहे.

बॉक्स ऑफिसची अवस्था पाहून शाहरुख खान चांगलाच घाबरला आहे. सलमान खानचा राधे आणि शेवटी आमिर खानचा लाल सिंग चड्ढा यांची अवस्था पाहून तो अतिशय हुशारीने चित्रपट निवडतोय. शाहरुखला यावेळी कोणताही धोका पत्करायचा नाही. असे म्हटले जात आहे की त्याला विश्वास आहे की त्याचे डॉन हे एक आयकॉनिक पात्र आहे आणि त्याला ही भूमिका देखील आवडते. पण जोपर्यंत तो चित्रपटाच्या स्क्रिप्टवर पूर्णपणे समाधानी होत नाही तोपर्यंत त्याला ते तयार होणार नाही.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर शाहरुखने डॉन 3 नाकारल्यानंतर फरहान अख्तरने पुन्हा चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू केले आहे. शाहरुखने गेल्या 2 डॉनमध्ये काम केले आहे आणि दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना डॉन 3 साठी बराच वेळ वाट पाहावी लागेल असे म्हणता येईल.

सध्या शाहरुख खान पठाण, जवान आणि डंकी या तीन सिनेमांवर काम करत आहे. तिन्ही चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे. वृत्तांवर विश्वास ठेववायचा झाला तर शाहरुख त्याच्या ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी एक महिना चेन्नईमध्ये राहणार आहे. तो येथे एका ठिकाणी साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत सीन शूट करणार आहे.

त्याचा ‘जवान’ चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो यशराज यांच्या ‘पठाण’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. त्याचबरोबर तो तापसी पन्नूसोबत ‘डंकी’ हा चित्रपटही करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
शाहरुख खानचा ‘मॉन्स्टर’ लुक आला समोर , बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा

Bollywood Actress: शाहरुख खान आणि सेक्सच विकले जाते, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या विधानाने उडाली होती खळबळ