Share

काँग्रेसवर कोणाची वैयक्तिक मालकी नाही; पक्षालाच घरचा आहेर देत पृथ्वीराज चव्हाण कडाडले

chavhan
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काल काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे.

तर आता चव्हाण यांनी पक्षाबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही तंत्रापासून देश वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने अंतर्गत प्रश्न त्वरित सोडवावेत. गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चिंतन करावे अन कारभार सुधारावा, असं त्यांनी म्हंटलंय.

माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, सोनिया गांधी होत्या तेव्हा विजय मिळत गेला. आमची चूक झाली याआधी आम्ही हे बोलायला हवं होतं. निवडणूक घेऊन जे निवडून येईल ते मान्य केले पाहिजे. एकाच कुटुंबातील जास्त नको. मग राहुल गांधी कोणत्या कुटुंबातील आहेत, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

याचबरोबर काँग्रेस पक्षाला वाचवायचा असेल निवडणूक घ्यायला हवी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस पक्ष कुणाच्या वैयक्तिक मालकीचा नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडे घटनेची नोंद आहे, असं म्हणत चव्हाण यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

तसेच पुढे बोलताना चव्हाण यांनी म्हंटलं आहे की, ‘विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना मतदान न करता पैसे घेऊन भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या ७ आमदारांवर कारवाई होत नसेल तर काय बोलणार असा दावाही चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, चिंतन शिबिर घेणे गरजेचं असताना नव चेतना शिबिर घेण्यात आलं. पक्षात 24 वर्षात कोणतीच निवडणुक न झाल्यामुळे कोणतेच सामुदायिक निर्णय घेण्यात आले नाहीत. घटनेवर आधारित काँग्रेसमध्ये निवडणुका घ्या. कटपुतली सारखा अध्यक्ष नको”, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली.

महत्त्वाच्या बातम्या
१५ दिवसांनी शुद्धीवर येताच राजू श्रीवास्तवांनी पत्नीला पाहून उच्चारले ‘ते’ चार शब्द; वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येई
थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी
AAP: दिल्लीतही ऑपरेशन लोटस, आपचे ४० आमदार नाॅट रिचेबल; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भर विधानसभेत जाहीर सवाल, म्हणाले, ‘आम्ही गद्दार असतो तर…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now