Share

Thriller: ‘हे’ 6 चित्रपट तुमच्या अंगावर आणणार काटा, पुढील महिने असतील मिस्ट्री, सस्पेन्स अन् थ्रिलरने भरलेले

Bollywood Movies, Suspense, Thriller, Taapsee Pannu/ प्रेम, अ‍ॅक्शन, कॉमेडी तर झाली, पण आता येत्या काही महिन्यांत रुपेरी पडद्यावर सस्पेन्स आणि थ्रिलरनी भरलेले चित्रपट प्रेक्षकांना अंगावर काटा उभा करेल. बॉयकॉट ट्रेंड सुरु झाल्यामुळे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. अशातच चाहत्यांना सस्पेन्स आणि थ्रिलरनी भरलेले चित्रपट पाहायला मिळणार आहे. अशाच काही चित्रपटांची नवे जाणून घ्या.

Blurr

ब्लर (Blurr):
सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये पारंगत असलेली तापसी पन्नू आता एक थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहे, जो एका स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट एका महिलेवर आधारित आहे जिला तिच्या जुळ्या बहिणीच्या मृत्यूमागील रहस्याचा शोध जस-जसा घेते तस-तशी दृष्टी कमी होते.

Merry Christmas

मेरी ख्रिसमस (Merry Christmas):
साऊथ स्टार विजय सेतुपती, कतरिना कैफ, संजय कपूर आणि विनय पाठक स्टारर मेरी ख्रिसमस हा चित्रपट खूप चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की हा वर्षातील सर्वात मोठा थ्रिलर चित्रपट असणार आहे. कारण याचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत जे सर्वोत्कृष्ट थ्रिलर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. हा चित्रपट 23 डिसेंबरला रिलीज होत आहे.

Kuttey

कुत्ते (Kuttey):
अर्जुन कपूर, कोंकणा सेन शर्मा, तब्बू, नसीरुद्दीन शाह आणि राधिका मदान यांसारख्या स्टार्सनी सजलेला कुत्ते या चित्रपटाची घोषणा काही वेळापूर्वीच करण्यात आली होती आणि आता बातमी अशी आहे की हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे शीर्षक अगदी अनोखे आहे, कथा खूप पॅक ठेवली आहे. सध्या कथेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा देखील सस्पेन्स, रहस्याने भरलेला चित्रपट असेल असे बोलले जात आहे.

The Delhi files

दिल्ली फाइल्स (The Delhi files):
काश्मीर फाइल्सच्या यशानंतर दिल्ली फाइल्सची घोषणा करण्यात आली. 1984 च्या शीख दंगलीवर आधारित हा चित्रपट अनेक जखमा ताज्या करील आणि काही भीषण घटनांमुळे हृदय पिळवटून टाकेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

Drishyam 2

दृश्यम 2 (Drishyam 2):
अजय देवगणचा दृश्यम हा सस्पेन्स, मिस्ट्री आणि थ्रिलरने भरलेला होता ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच वेळी, दृश्यम 2 ची घोषणा झाल्यापासून, चाहते त्याची वाट पाहत आहेत आणि बातमी आहे की लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विजय साळगावकर 18 नोव्हेंबरला नव्या कथेसह चित्रपटगृहात दाखल होणार आहेत.

Vikram vedha

विक्रम वेधा (Vikram vedha):
साऊथच्या या रिमेकची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण यामध्ये दोन पॉवर पॅक्ड स्टार्स दिसणार आहेत, तेही एकमेकांसोबत नाही तर समोरासमोर. सैफ अली खान आणि हृतिक रोशन. या चित्रपटाची झलक समोर आली असून आता त्यांचे चाहते फक्त त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. चित्रपटाची रिलीज डेट 30 सप्टेंबर सांगितली जात आहे.

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now