ED: ओमकार रिअल्टर्सचे प्रवर्तक बाबूलाल वर्मा आणि अध्यक्ष कमल किशोर गुप्ता यांना विशेष न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपातून दोषमुक्त केले. कोणताही अनुचित गुन्हा नसल्यास कोणाला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रीग (पीएमएलए) अंतर्गत अटकेत ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ईडीला मोठा धक्का बसला.
उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत विशेष न्यायालयाने या दोघांच्या प्रकरणाबाबत निकाल दिला आहे. यामुळे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) धक्का बसला. ईडीने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने तातडीने निर्णय देण्यास नकार दिला आहे.
तसेच या प्रकरणाबाबत तुम्ही आपले म्हणणे विशेष न्यायालयासमोर मांडा, असे म्हणत उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता ईडीसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे.
औरंगाबादमध्ये जिमखाना संचालकाच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी वर्मा व गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणाची ईडीने दखल घेतली. पुढे विशेष न्यायालयाने या प्रकरणाबाबत अंतिम सुनावणी करत या दोघांना दोषमुक्त केले.
वर्मा व गुप्ता यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला आहे की, मूळ तक्रार गैरसमजतीमुळे दाखल झाली होती. आरोपींनी सर्व थकबाकी दिली आहे. पोलिसांनी तसा क्लोजर रिपोर्ट दिला आहे. स्थानिक न्यायालयाने हा रिपोर्ट स्वीकारल्यामुळे आता आरोपींना एक मिनिटही कोठडीत ठेवणे बेकायदेशीर आहे.
गुप्ता व वर्मा यांचा वकिलाच्या सर्व युक्तिवाद तसेच ईडीच्या वकिलाचा युक्तिवाद विशेष न्यायालयाने ऐकून घेतला. त्यानंतर या प्रकरणातून त्या दोघांची सुटका केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अंतिम जामीन मंजूर केला आहे. मात्र विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ईडीने हाय कोर्टात धाव घेतली. या प्रकरणाचे आता पुढे काय होते? हे पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
Thailand: लोकांनी मुलीचा मृतदेह समजून पोलिसांना बोलावलं पण ती निघाली महागडी सेक्स डॉल
BJP : मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपचा वॉच; कार्यालयात कायम असणार फडणवीसांचा ‘हा’ खास माणूस
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे बोलले तुम्हाला लाज वाटली पाहिजे; भडकलेले मुनगंटीवार म्हणाले, आपल्या वडिलांना…






