Share

आदित्य ठाकरे वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, मात्र.., बंडखोरांना दिली एक अट

aditya thackeray
आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. काल दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील जोरदार राड्याने झाली होती. आज देखील सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.

यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे. या आंदोलनावेळी सत्ताधारी नेत्यांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळालं. यावर आदित्य ठाकरेंचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यवरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

याचबरोबर आमचा राजीनामा मागण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनीच राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, हे बंडखोरांचं आव्हान आज आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हंटलं आहे की, “चला मी वरळीच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे.’

‘मात्र त्याअगोदर तुम्ही राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरा. विधानसभा बरखास्त करुन उतरा निवडणुकीच्या रिंगणात. जनतेला ठरवू द्या कुणाची लोकप्रियता किती आहे, असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलं आहे. यामुळे आता बंडखोर हे आव्हान स्वीकारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘सध्या राज्याच्या राजकारणात जे घडलं ते देशाला हानी पोहोचवणारं होतं. असंच जर देशाच्या इतर राज्यात घडायला लागलं तर देशात अस्थिरता निर्माण होऊ शकते, कुठल्याही देशाला हे सहन होणार नाही. म्हणून गद्दारांनो द्या राजीनामे आणि उतरा निवडणुकीच्या रिंगणात.’

तसेच विधानभवनात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आमदारांची आपल्याला कीव येते.’ एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागते. मला खरोखर यांची कीव येते, असा खोचक टोला आदित्य यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-
Canada: नवऱ्यासोबत मिळून बहिणीवरच केला बलात्कार, क्रुरतेची कहाणी ऐकून जजही झाले हैराण
तिकिटासाठी पैसे नाहीत, म्हणून तरुणाने एसटीच्या पाठीमागे लटकून केला प्रवास; पाहा फोटो
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास अन् वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा…; अभिनेत्रीने महीलांना दिला ‘हा’ सल्ला
राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याने केलं ‘हे’ हैराण करणारं काम, बाळा नांदगावकरांनीही केलं कौतूक
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now