Share

विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? फडणवीसांनी पुर्ण घटनाक्रमच सांगीतला

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं १४ ऑगस्टला अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेकांकडून मेटे यांचा अपघात झाला की घातपात होता, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यावर आज पावसाळी अधिवेशनात देखील चर्चा झाली.

सध्या, विनायक मेटेंच्या अपघाताची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. तरी विरोधी पक्षासह शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यात आज अधिवेशनात कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मेटेंच्या अपघाताचा मुद्दा उपस्थित केला.

गायकवाड यांनी विधानसभेत विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत लक्षवेधी उपस्थित केली. या लक्षवेधीमध्ये विनायक मेटे यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही. वेळेवर रुग्णवाहिका येत नाही, असा आक्षेप घेण्यात आला. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई पुणे एक्स्प्रेसवर भल्या पहाटे मेटे हे मुंबईकडे येत होते. त्यावेळी एक्स्प्रेसवर एक मोठा ट्रॉलर हा शेवटच्या लेनमध्ये चालला होता, जो मधल्या लेनमध्ये चालला होता. त्यामुळे मेटे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी जागा मिळत नव्हती.

त्यामुळे काही काळ मेटेंच्या चालकाने प्रयत्न केला. पण, जागा कमी असल्यामुळे त्यांना ओव्हरटेक करता आले नाही. त्यानंतर पुढे जाऊन ट्रॉलर तिसऱ्या लेनमध्ये गेला आणि तिसऱ्या लेनमध्येही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तिथेही समोर एक गाडी होती.

तिथे जागा कमी होती, पण तिथूनही ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते अतिशय चुकीचे जजमेंट होते. त्यामुळे गाडी ट्रॉलरला धडकली. कारच्या ज्या बाजूने अंगरक्षक आणि विनायक मेटे बसले होते, त्याबाजून कार धडकली.

तसेच फडणवीस म्हणाले, मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही, असं म्हटलं गेलं आहे. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई आणि रायगड पोलीस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. पण अपघाताची लोकेशन कळू शकत नव्हती. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं आहे.

त्यानंतर, पोलीस जेव्हा सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना कुणीच दिसले नाही. पुढे आणखी एक दीड किलोमीटर पोलीस गेले, तिथेही त्यांना कुणी आढळलं नाही. त्यामुळे मेटेंच्या चालकाने फोन खरा केला की खोटा केला, असा प्रश्ननिर्माण झाला होता.

तेवढ्यात पोलिसांनी पुन्हा त्याला फोन केला, तेव्हा तो रायगड पोलिसांच्या हद्दीत अपघाताचे ठिकाण होते. तोपर्यंत आरबीआयची गाडी तिथे ७ मिनिटांमध्ये पोहोचली होती. मेटेंना रुग्णालयात घेऊन गेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासताच मृत्यू घोषित केलं. आता मेटे यांचा मृत्यू नेमका जागेवर झाला की वाटेवर याबाबत चौकशी सुरू आहे त्यामुळे लवकरच माहिती समोर येईल असे फडणवीस म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now