आपल्या आजूबाजूला दररोज नवनवीन घटना घडत असतात. काही घटना या सकारात्मक असतात तर काही नकारात्मक..! काही आनंदाच्या बातम्या असतात तर काही दु: खच्या..! मात्र अलीकडे सोशल मिडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण मोठ्या जास्तच वाढले आहे.
इंटरनेटमुळे अख्ख जग आता आपल्या मुठीत आलं आहे. तसेच आता ऑनलाईन पद्धतीने लग्न जुळविण्याचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. मात्र याच ऑनलाईनच्या दुनियेत मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे देखील प्रमाण वाढलं आहे. असाच काहीसा प्रकार आता पुन्हा उघडकीस आला आहे.
वाचा नेमकं प्रकरण काय?
Shadi.com या वेबसाईटवर व्यावसायिकाची महिलेसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. या महिलेच आधी पहिलं लग्न झालं होतं. मात्र काही कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला. आता पुन्हा ती महिला या व्यावसायिकाच्या प्रेमात पडली. मात्र पुढे जे घडलं ते वाचून तुम्हाला नक्कीच हादरा बसेल.
त्याचं झालं असं, एका व्यावसायिकाचं घटस्फोट घेतलेल्या महिलेसोबत सूत जुळलं, प्रेमात रूपांतर झाल्यानंतर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. प्रेमविवाह देखील त्यांनी केला. लग्न झाल्यावर तीन महिन्यांनी दोघे हनिमूनसाठी युरोपला गेले. तिकडे यांनी एन्जॉय केला.
त्यानंतर ते भारतात पुन्हा परतले. मात्र काही दिवसांमध्येच दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला. वाद झाल्यावर महिलेने तीन महिन्यातच घर सोडलं आणि फरार झाली. धक्कादायक बाब म्हणजे, महिला 50 लाखांचे दागिने घेऊन फरार झाली. व्यावसायिकाने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र ती त्याचा फोन घेत नाही, अखेर त्या व्यावसायिकाने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. व्यावसायिकाने तक्रार करत महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अद्याप महिलेचा शोध लागलेला नाहीये.
महत्वाच्या बातम्या
Cricketer: एकेकाळी होता स्टार क्रिकेटपटू, आता रिक्षा चालवून भरतोय पोट, कहाणी वाचून डोळे पाणावतील
security : देशाच्या सुरक्षेलाच नख, मोठा घोटाळा उघड; अनेक बडे अधिकारी अडकणार
आगामी निवडणुकांसाठी दृष्टीने राज ठाकरे ऍक्टिव्ह; नाराज वसंत मोरेंना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
Shambhuraj Desai : काहीही झालं तरी गद्दार शंभुराज देसाईंना पाडणारच; शिवसेनेच्या वाघाने फोडली डरकाळी