Share

Dolo: कोरोनात डाॅक्टरांनी तुम्हालाही डोलो खायला दिली होती का? आता उघड झालेले सत्य पाहून धक्का बसेल

dolo 650

डोलो(Dolo): कोरोना काळात ताप आला की दवाखान्यात गेल्यास कोरोना पॉजीटीव निघेल ही भीती सर्वांच्या मनात होती. या भीतीपोटी काही लोकांनी घरीच राहून औषधं घेतली. तेव्हा सर्वात प्रसिद्ध झालेली गोळी म्हणजे डोलो ६५० एम जी. बहुतांश वेळा डॉक्टरांनीसुद्धा हीच गोळी लिहून दिली. याच गोळीबाबतीत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तापासाठी औषध म्हणून डोलो ६५० द्यावी, याकरिता औषध बनवणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना भेटवस्तू दिल्या.

त्या भेट वस्तू देण्यासाठी १००० कोटींहून अधिक खर्च केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. कोरोना महामारीच्या काळात ‘डोलो’ हे औषध खूप प्रसिद्ध झाले. त्याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. वैद्यकीय प्रतिनिधींच्या एका संस्थेने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याबाबत माहिती दिली. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियातर्फे ज्येष्ठ वकील संजय पारीख यांनी याबाबत बाजू मांडली आहे.

संजय पारीख यांनी खंडपीठाला माहिती दिलेली आहे की, “डोलो ६५० एमजी फॉर्म्युलेशनसाठी १००० कोटी रुपयांहून अधिक मोफत भेट दिली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अहवालाचाही त्यांनी याप्रकरणात माहितीचा स्रोत म्हणून उल्लेख केला. गुरुवारी सुप्रीम कोर्टातही डोलो-६५० टॅबलेटची चर्चा होती. एका एनजीओने १००० कोटी किंमतीच्या भेटवस्तुबाबतचा आरोप केला आहे.

डोलो निर्मात्याने १००० कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या भेटवस्तु डॉक्टरांना दिल्या होत्या, असा दावा एनजीओने केला आहे. न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणाच्या तळागाळापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.डोलो ही गोळी रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिण्यासाठी या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

डोलो ही गोळी बनवणाऱ्या कंपनीचे नाव मायक्रो लॅब्स लिमिटेड आहे. आयकर विभागाने गेल्या महिन्यात नऊ राज्यांमध्ये कंपनीच्या ३६ ब्रान्चवर छापे टाकले होते. कंपनीने आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना १,००० कोटी रुपयांच्या भेटवस्तू वितरित केल्याचा आरोप आहे. न्यायालयात १० दिवसांनी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होईल. ही गंभीर बाब आहे, असं खंडपीठाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
Health: बियर पिल्याने किडनीस्टोन खरंच बरा होतो का? जाणून घ्या सत्य माहिती
Vegetables: पावसाळ्यात ‘या’ ५ भाज्यांपासून राहा दूर, नाहीतर पडताल आजारी, सावधान राहा
Bachu Kadu: बंडखोर बच्चू कडूंनी केली पंक्षातरविरोधी कायदा रद्द करण्याची मागणी, सांगितले ‘हे’ कारण
Brain dead symptom : राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड झालाच कसा? ब्रेन डेड कसा होतो, त्यानंतर माणूस किती दिवस जगू शकतो?

आरोग्य इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now