Accused of rape on player: क्रीडा जगतात मोठे नाव असणाऱ्या अनेक खेळाडूंवर विविध प्रकारचे गंभीर आरोप होत असल्याचा घटना अनेकदा समोर आल्या आहेत. कधी मॅच फिक्सिंगचा घोटाळा, कधी मैदानात गोंधळ घालण्याचा प्रकार, तर कधी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खेळाडूंवर झाला आहे. अशाच एका प्रकाराने सध्या जगाचे लक्ष वेधले आहे.
प्रसिद्ध फुटबॉलपटू, विश्वचषक विजेता, मँचेस्टर सिटीचा बेंजामिन मेंडी याच्यावर अनेक महिलांनी बलात्काराचा आरोप केला आहे. एका महिलेने त्याच्याविरुद्ध न्यायालयात बलात्काराची याचिका दाखल केली. मेंडीवर झालेल्या बलात्काराच्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण फुटबॉल जगत हादरले.
महिलेने सांगितलेल्या घटनेनुसार २०२० ला एका बारमध्ये मेंडीने त्या महिलेला बघितले. त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला आपल्या घरी नेऊन बलात्कार केला. त्या महिलेने घटनाक्रम सांगताना सांगितले की, बारमध्ये मेंडी तीच्याजवळ आला. तसेच जबरदस्तीने त्याने रुरल चेशायर येथील त्याच्या घरी तिला बेडरूममध्ये नेले.
त्या आधीच त्या महिलेचा मोबाईलने काढून घेतला होता. घरी गेल्यानंतर त्याने फिंगर प्रिंटने त्याच्या बेडरूमचं डोअर ओपन केलं. त्यानंतर आत गेल्यावर तो म्हणाला की, आता तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही. डोअर लॉक आहे. त्यानंतर तिने विरोध करून पण त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असे संबंधित महिलेने न्यायालयाला सांगितले.
दरम्यान ५ महिलांनी फुटबॉलपटू बेंजामिन मेंडीवर बलात्काराचा आरोप केला आहे. त्याआधीच २ किशोरवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मेंडीवर दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणे बाकी आहे. तेच हे नवीन प्रकरण समोर आले.
याचिकाकर्त्या संबंधित महिलेने वारंवार नकार देऊन पण मेंडी ऐकत नव्हता. त्यावेळी १० हजार महिलांवर बलात्कार केला आहे, असे मेंडीने सांगितल्याचा आरोप महिलेने केला आहे. मेंडीवर होणारे आरोप कितपत खरे, हे तर न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र यामुळे फुटबॉल जगतात एकच खळबळ माजली आहे.
महत्वाच्या बातम्या-
NV Ramana: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रमण्णा निवृतीवेळी करणार मोठा खुलासा; स्वतःच केली मोठी घोषणा
Uttar Pradesh: हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने केले अपहरण, तपासात समोर आले धक्कादायक सत्य
Bilkis Bano: ज्याचं जळतं त्यालाच कळतं, बिलकीस बानोच्या दोषींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांनी व्यक्त केली खंत






