CM Eknath Shinde: आज राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. गोविंदांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवाचा माहोल काही औरच आहे. टेंभी नाका येथील दहीहंडीला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. तसेच यावेळी बोलताना एक मोठे विधान त्यांनी केले आहे.
धर्मवीर आनंद दिघेंची ठाणेकर मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा होती. आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणाताई यांनी ती ईच्छा माझ्याकडे बोलून दाखवली होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आज धर्मवीर आनंद दिघे यांची तीच इच्छा पूर्ण झाली. टेंभी नाक्यावरील या दहीहंडीला यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती.
सण उत्सवांची आवड असणाऱ्या धर्मवीर आनंद दिघेंनी ठाण्यामध्ये टेंभी नाक्यावर दहीहंडी उत्सव सुरू केला. बघता-बघता टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सव राज्यभरात लोकप्रिय झाला. आणि अनेक ठिकाणी गोविंदा पथकं तयार झाली.
त्यामुळेच ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाला वेगळे महत्त्व आहे. याच दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, आज मानाच्या दहीहंडीला उपस्थित राहताना मला आणखी एका गोष्टीचा आनंद होत आहे. ठाणेकर मुख्यमंत्री व्हावा हे धर्मवीर आनंद दिघेंचे स्वप्न आज पूर्ण झाले.
पुढे ते म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकरी, कष्टकऱ्यांचे आहे. तसेच ते गोविंदांचे पण आहे. आनंद दिघेंनी दहीहंडीचा उत्सव राज्यभर नेला. त्याच गोविंदांसाठी राज्य सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. सार्वजनिक सुट्टी, १० लाखांचा विमा आणि दहीहंडीला सहासी खेळाचा दर्जा देण्याचे काम आम्ही केले, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
Raid on lodge in Jalgaon : जळगावात पोलिसांची लॉजवर रेड, आक्षेपार्ह अवस्थेत सापडलेल्या १३ मुलींनी केला धक्कादायक दावा..
फडणवीसांसाठी ब्राह्मण महासंघ मैदानात! मोदींचा उल्लेख करत केली मोठी मागणी, म्हणाले “मोदींनंतर भाजपात…”
Santosh Juvekar : दहीहंडी हा सण आहे तो सणासारखाच साजरा करा, त्याची स्पर्धा करू नका; अभिनेता संतोष जुवेकरने ठणकावले