बॉलिवूड (Bollywood): गेल्या अनेक महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखर व बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हे 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणात अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. अनेकदा अभिनेत्रीची चौकशीही करण्यात आली आहे. एक भारतीय व्यापारी आणि ठग असलेला सुकेश चंद्रशेखर. ज्याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षापासून फसवणुकीचे काम सुरू करून करोडो रुपये पचवले होते.
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई सुरु आहे. या प्रकरणात जॅकलिन सुद्धा सामील असल्याचा डीचा दावा आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केली आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही या आरोपपत्रात आरोपी म्हणून नोंदवण्यात आलं आहे. जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात जॅकलिन आणि सुकेश यांच्यामध्ये संबंध असल्याचं दिसून आल होतं.
अभिनेत्रीला सुकेशकडून दागिने, कार यांसारख्या महागड्या वस्तू भेट दिल्या गेल्या, असेही समजले होते. म्हणून जॅकलिनला देशाबाहेर जाण्यास परवानगी नाही. इतकंच नव्हे तर जॅकलिन आणि सुकेश यांचे खाजगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली होती. सुकेश चंद्रशेखर विरोधात 200 कोटींचे मनी लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणा संदर्भात अभिनेत्रीवर आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी सांगण्यात आले होते की, सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगात होता. तेव्हा जॅकलिन त्याच्या संपर्कात होती. त्यामुळे ईडीने अनेकदा अभिनेत्रीला चौकशीसाठीही बोलावलं होतं. परंतु, या प्रकरणावर बोलताना जॅकलिन आपण या प्रकरणात आरोपी नसून साक्षीदार असल्याचं सांगते. यापूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या वस्तू भेट दिल्याचं उघडकीस आलं होतं. इतकंच नाही तर अभिनेत्रीला आपल्या बिग बजेट सिनेमात मुख्य भूमिका देण्याचे प्रलोभनही त्याने दिल्याचं सांगण्यात येतं.
जॅकलिन आणि सुकेश ची ओळख
अभिनेत्रीने सांगितले की, तिने सुकेशशी संपर्क साधला तेव्हा त्याने स्वतःची ओळख सन टीव्हीचा मालक म्हणून करून दिली होती. आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून तो चेन्नईचा असल्याचेही त्यांनी सांगितले. सन टीव्हीच्या रूपाने त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. मी तुझा खूप मोठा चाहता आहे, आणि तू दाक्षिणात्य चित्रपट करावेत असेही सुकेशने जॅकलिनला म्हटल्याचे तिने सांगितले. तेव्हापासून दोघेही संपर्कात आले होते.
महत्वाच्या बातम्या
Bollywood: फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर तब्बूची विचित्र प्रतिक्रिया, म्हणाली, कलाकारांनी टेंशन घेऊ नका कारण..
Raj Thackrey: लालसिंग चढ्ढा फ्लाॅप झाल्यानंतर आमिरने घेतली राज ठाकरेंची भेट; काय आहे भेटीमागचे कारण…
अजितदादा विरोधातही फुल फाॅर्मात! पहील्याच प्रश्नात शिंदे सरकारची दांडी गूल
जखमेवर मीठ टाकणारी आपण औलाद; उगाच पावसाचं नाव बदनाम करायचं; बच्चू कडू भडकले