Kacha Badam, Anjali Arora, MMS/ ‘कच्चा बादाम’वर (Kacha Badam) डान्स करून लोकप्रिय झालेली सोशल मीडिया स्टार अंजली अरोरा (Anjali Arora) गेल्या काही दिवसांपासून एका व्हायरल सेक्स क्लिपमुळे चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अंजली असल्याचा दावा लोक करत आहेत. मात्र तिने हे दावे फेटाळून लावले आहेत. आता या व्हिडिओबाबत अंजलीची नवी प्रतिक्रिया समोर आली आहे.
अंजली म्हणते की, आता तिला या सर्व गोष्टींची पर्वा नाही. वास्तविक, नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान अंजलीला व्हायरल एमएमएसवर प्रश्न विचारण्यात आला होता. आधी प्रश्न ऐकून तिचा चेहरा पूर्ण पडला होता, मग उत्तर देताना ती थोडी चिडलेली दिसली. मात्र तिला या सर्व गोष्टींची पर्वा नसल्याचही तिने स्पष्ट केल.
ती म्हणाली, हे बघा, जे माझी बरोबरी करू शकत नाही, ते शेवटी बदनामी करू लागतात. त्यामुळे लोकांना हवे ते करू द्या, मला कोणाचीही पर्वा नाही. यावेळी अंजलीने अपशब्दही वापरले, जे बातमीत लिहिता येत नाही. तसेच अंजलीच संतप्त रूप तुम्हाला पाहायला मिळेल.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीतही अंजलीने व्हायरल झालेल्या सेक्स क्लिपवर प्रतिक्रिया दिली होती आणि ती बोलत असताना रडली होती. व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी आपण नसल्याचे तिने सांगितले होते. अंजलीने असेही म्हटले होते की ती आत्ताशी 21 वर्षांची आहे आणि अशा दबावाचा सामना करण्यास तयार नाही.
असे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करणाऱ्या लोकांना तिने शिव्याशाप दिले. तसेच ती म्हणाली होती की, लाज वाटली पाहिजे की ते कोणाच्या तरी इज्जतीशी खेळत आहेत. अशा लोकांमध्ये माणुसकी संपली आहे का, असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. या बदनामीमुळे तिला प्रचंड तणावाचा सामना करावा लागत आहे.
मूळची दिल्लीची, अंजली अरोरा ही एक मॉडेल, अभिनेत्री आणि व्यवसायाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. अंजलीचे इंस्टाग्रामवर सुमारे 12 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर तिला लाखो फॉलोअर्स आहेत. ती कंगना राणौतच्या रिअॅलिटी शो ‘लॉकअप इंडिया’मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती, जिथे मुनव्वर फारुकीसोबतच्या तिच्या जवळीकतेची खूप चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या-
रानू मंडल पुन्हा आली भेटीला, गायलं कच्चा बादाम गाणं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ
VIDEO: बंगाली नवरीच्या वेशात राणू मंडलने गायलं कच्चा बदाम गाणं, लोकं म्हणाले, लवकरच जगबुडी होणार
कच्चा बदाम फेम भुबन बड्याकर यांच्या अपघाताचे खरे कारण आले समोर, वाचा नेमकं काय घडलं..