राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष बाब म्हणजे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होणार असल्याच बोललं जातं आहे. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर उपसभापती निलम गोऱ्हे संतापलेल्या पाहायला मिळाल्या.
वाचा नेमकं घडलं काय? त्याचं झालं असं, राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमीप्रमाणे आपल्या पद्धतीने भाषण करत होते. मुद्दा मांडत सविस्तरपणे उत्तर देतं होते. मात्र गुलाबराव पाटील हे भाषण करत असतानाच उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना एक सूचना केली.
मात्र गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक प्रतिक्रिया न देता उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका… असं म्हणत गुलाबरावांनी नीलम गोऱ्हे यांच्याकडे हातवारे केले. गुलाबराव यांच्या याच कृतीवर मात्र नीलमताई प्रचंड भडकल्या. थेट सभागृहात त्यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.
भर सभागृहात निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना स्पष्टच सांगितलं की, “तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता… बसा खाली… मंत्री असाल तुमच्या घरी….”, अशा शब्दात निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापले.
दरम्यान, जाणून घ्या नेमका वाद कशावरून झाला..? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. आणि नेमकं त्याचं वेळी पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावर नीलम गोऱ्हे या प्रचंड भडकलेल्या पाहायला मिळाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
अजितदादांनी तानाजी सावंतांना जागा दाखवली; विधानसभेत सावंतांच्या फजितीचीच चर्चा
पुन्हा नवा ट्विस्ट! भाच्याने केला खळबळजनक दावा; “…अन् तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच”
Aditya Thackeray : भाजपमध्ये सुद्धा आहेत आदित्य ठाकरेंचे जबरा फॅन; थेट पुरावाच आला समोर
34 years of imprisonment : एक ट्विट पडले महागात; महिलेला ठोठावली तब्बल ३४ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, वाचा पुर्ण प्रकरण…