Share

Shahnaz Gill: सिद्धार्थला विसरली शहनाज गिल, आता ‘या’ अभिनेत्याच्या पडलीये प्रेमात? चर्चांना उधाण

Shahnaz Gill

Shahnaz Gill, Siddharth Shukla, Raghav Juyal, Kabhi Eid Kabhi Diwali/ पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल (Shehnaaz Gill) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहनाजचे नाव घेतले की त्याच्यासोबत सिद्धार्थ शुक्लाची आठवण येते. मात्र आता शहनाज दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडत असल्याची बातमी समोर येत आहे आणि दोघांमधील जवळीक वाढू लागली आहे. त्यामुळे शहनाज गिल आता सिद्धार्थ शुक्लाला विसरत आहे का? सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणी मागे सोडून शहनाज आता नवीन आयुष्याच्या शोधात आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहे.

‘बिग बॉस 13’ च्या स्पर्धकाला तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्याचे वृत्त आहे. होय, शहनाज तिचा खास मित्र सिद्धार्थ शुक्ला गेल्यापासून सतत चर्चेत असते. आधी तिने काही महिने स्वत:ला कैद करून ठेवले आणि आता ती हळूहळू तिच्या कामात मग्न झाली आहे आणि सतत काम करत आहे. दरम्यान, तिच्या लव्ह लाईफबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

खरं तर, शहनाजच्या लव्ह लाईफबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. हे ऐकून नक्कीच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. शहनाज गिल पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे ऐकू येत आहे. आता कोण आहे ही भाग्यवान व्यक्ती, जाणून घेऊया.

रिपोर्टनुसार, कभी ईद कभी दिवाळीच्या सेटवर शहनाजची सुप्रसिद्ध कोरिओग्राफर राघव जुयालसोबतची जवळीक वाढत आहे. या चित्रपटात राघव महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहनाज गिल आणि राघव जुयाल चांगले मित्र बनले आहेत, ते दोघे एकमेकांना खूप आवडतात आणि अनेकदा त्यांना एकत्र वेळ घालवायला आवडते. दोघांच्या अफेअरचे हे वृत्त किती खरे आणि किती खोटे, हेही लवकरच कळेल.

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, राघव आणि शहनाज ऋषिकेशच्या सहलीला गेले होते. दोघेही विमानतळावर एकत्र दिसले. शहनाज आणि राघवची जवळीक हा शोबिझ इंडस्ट्रीमध्ये गॉसिपचा विषय आहे. या अफेअरच्या बातम्यांवर शहनाज किंवा राघव दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

इतकेच नाही तर शहनाज गिलही राघव जुयालसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी गेली होती. दोघांनी एकत्र फोटो शेअर केले नाहीत, पण त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकाच ठिकाणचे वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. तूर्तास हे पाहावे लागेल की, जर ते खरोखरच एकमेकांना डेट करत असतील तर ते त्यांचे नाते कधी सर्वांना सांगणार.

महत्वाच्या बातम्या-
Shehnaz Gill : सलमान खानने शहनाज गिलची चित्रपटातून केली हकालपट्टी? स्वत: शहनाजने केला खुलासा, म्हणाली..
..अन् शहनाज गिलला पाहताच मुलगी झाली बेभान, गळ्यात पडून ढसाढसा पडली, पहा व्हिडीओ
‘लग्नानंतर कतरिना बनली आहे पंजाबची कतरिना’, शहनाज गिलने सांगितले यामागचे कारण
VIDEO: शहनाजने जिंकली चाहत्यांची मनं, ब्रम्हकुमारी सिस्टरसोबत दिसली तेव्हा खिळल्या लोकांच्या नजरा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now