मराठी अभिनेता किरण माने त्यांच्या ‘मुलगी झाली हो’ या कार्यक्रमामुळे घरोघरी पोहोचले. उत्तम अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. अभिनयासोबत त्यांनी वेळोवेळी राजकीय मुद्द्यांवर आपली मांडलेली मतं यामुळे देखील ते प्रचंड चर्चेत आले.
मध्यंतरी त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरणारी विधाने केली. तेव्हा त्यांना चालू शो ‘मुलगी झाली हो’ कार्यक्रमातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर काही अभिनेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला तर काहींनी किरण माने यांनाच ट्रोल केलं. तर जे कोणी किरण माने यांना समर्थन करत होतं, त्यांनाही ट्रोल केलं गेलं.
किरण माने यांच्या या प्रकरणात अभिनेत्री अनिता दाते यांनी माने यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली, तेव्हा त्यांना देखील ट्रोल करण्यात आले होते. हे प्रकरण आता ‘ बस बाई बस’ मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आले आहे. बस बाई बस या कार्यक्रमाला अनिता दाते ने हजेरी लावली होती.
यावेळी तिला ट्रोल केल्याबद्दल सुबोध भावे यांनी प्रश्न केला, यावर तिने आपण किरण माने यांच्या मताशी तेव्हाही सहमत होतो, आणि आत्ताही आहे असं ठामपणे सांगितलं. यावर आता किरण माने यांनी पोस्ट टाकत, सुबोध भावे आणि बस बाई बस या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.
किरण माने लिहितात, ‘झी मराठी’, तुमचे लै लै लै आभार… सहा महिन्यांपूर्वी माझ्या ‘अत्यंत वादग्रस्त ठरवल्या गेलेल्या’ विषयाला, तुमच्या प्राईम टाईममध्ये स्थान देऊन, त्यावर योग्य ते मत विचारायचं आणि मांडायचं ‘स्वातंत्र्य’ सुबोध भावे-अनिता दातेला दिल्याबद्दल !’..
मला काढनार्यांकडं या प्रश्नांची उत्तरं आजबी न्हाईत. म्हनूनच आजबी हे ‘विवेकी’ मुद्दे मांडून त्यावर ठाम असनारी अनिता दाते महत्त्वाची हाय. ते एडीट न करता प्रसारीत करनार्या ‘झी मराठी’ नं मला एका प्रकारे पोएटिक जस्टिस दिला, अनिता गेली पंधरा वर्ष मला ओळखत आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid03168J8EuTwHAhASY6nRFZdyUgkujiLfQkPUSTgBtvgt9vEQQgpQ9o2ibwEkBYUmfl&id=1460418198
हकालपट्टी झाली. सगळं चंबूगबाळं आवरुन जावं लागलं मुंबैला. मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ झाला. पन मी उभाच हाय. भक्कम. पाय रोवून. अभिमानानं. हसतमुख. कारन मी ‘खरा’ हाय. पाच महिला कलावंतांनी, सर्वसामान्य प्रेक्षकांनी आणि ग्रामस्थांनी दाखवलेली ही धमक कलाकारांना का दाखवता आली नाय? इतकी लाचारी का? असे किरण माने यांनी पोस्ट टाकत आपल्यावर झालेल्या अन्यायाची आणखी एकदा आठवण करून दिली.