Teacher, Mamoon Hussain, Khairun Nahar, Love Marriage, Suicide/ बांगलादेशातील शिक्षिका (Teacher) आणि विद्यार्थ्याची प्रेमकहाणी चर्चेचा विषय बनली आहे. प्रेमकथेचा क्लाइमेक्स म्हणजे शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यूने झाला आहे. तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थ्यासोबत प्रेमविवाह करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक 42 वर्षीय खैरुन नहारच्या मारेकरी पतीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दोघांनी 12 डिसेंबरला प्रेमविवाह केला होता. मात्र 14 ऑगस्ट रोजी खैरूनचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला.
ढाका न्यायालयाने सोमवारी (15 ऑगस्ट) महाविद्यालयीन शिक्षिका खैरुन नहर हिचा पती ममून हुसैन याला तुरुंगात पाठवले. नोटर न्यायिक न्यायालय-1 चे न्यायाधीश मोसलम उद्दीन यांनी दुपारी हा निकाल दिला. न्यायालयाचे निरीक्षक नजमुल हक यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी सदर पोलिसांनी ममूनला न्यायालयात हजर केले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावत त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले.
मृत खैरुन नहर जिल्ह्यातील गुरुदासपूर उपजिल्हा अंतर्गत खुबजीपूर मोझम्मेल हक पदवी महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाचे 42 वर्षीय सहायक प्राध्यापिका होती. तिने डिसेंबर 2021 मध्ये तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थ्याशी लग्न केले. 14 ऑगस्टच्या पहाटे नाटोरच्या बोलादिपारा भागात भाड्याच्या घरात तिचा मृतदेह सापडला.
मृतदेह सापडल्यानंतर ममूनला अटक करण्यात आली. चौकशी केल्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. खैरुन नहारच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, आरोपी ममूनला ड्रग्जचे व्यसन आहे. लग्नानंतर त्याने जबरदस्तीने त्यांच्याकडून पाच लाख रुपये आणि मोटारसायकल घेतली.
22 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी ममून हुसैनसोबत लग्न केल्यानंतर शिक्षिका खैरून तणावात होती. पत्नीने आत्महत्या केल्याचे ममूनने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त करत त्याला अटक केली. शिक्षिकेच्या कुटुंबीयांनीही त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
ममून आणि नहर यांचा 12 डिसेंबर रोजी काझी कार्यालयात विवाह झाला. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर 31 जुलै रोजी सोशल मीडियावर लग्नाची बातमी पसरताच विविध चर्चा आणि टीका सुरू झाल्या. तेव्हापासून खैरुन त्रस्त होती. या प्रकरणानंतर अवघ्या 14 दिवसांनी शिक्षिकेचा मृतदेह सापडला. मृताचा पुतण्या नाहिद हुसैन याने सांगितले की, ममूनला ड्रग्जचे व्यसन होते.
लग्नानंतर त्याने 5,00,000 रुपये (बांगलादेशी चलन) आणि एक मोटरसायकल तिच्या घरच्यांकडून घेतली. नुकतीच ममूनने आणखी महागडी मोटारसायकल मागितली होती. या प्रकरणामुळे खैरुन नहार तणावात होती. नाहिदने असा आरोप केला की नुकतीच गुरदासपूरमध्ये अंमली पदार्थांवरून काही बदमाशांमध्ये हाणामारी झाली, ज्याचा मामून देखील एक आरोपी आहे.
शिक्षिकेच्या नातेवाईकांनी सांगितले की, नवाब सिराज-उद-दौला सरकारी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असलेल्या 22 वर्षीय ममून हुसैनसोबत लग्न झाल्यानंतर खैरून मानसिक तणावातून जात होती. तिच्या लग्नावर बरीच टीका झाली होती. ती सायबर बुलिंगचा सामना करत होती. नोटर एसपी शरीफ उद्दीन यांनी सांगितले की, या घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा केला जाईल.