Share

ब्राम्हणांची पोरं खारीक-बदाम खातायत तर बहुजनांची पोरं.., काँग्रेस खासदाराची जीभ घसरली

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यातच काही दिवसांपासून विविध कारणांवरून काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळत आहे. आता काँग्रेसच्या एका खासदाराने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. टीका करताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी शिरवाळ भाषा वापरली. यावेळी ते काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेनिमित भद्रावती झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

देशात दिवसेंदिवस होत असणाऱ्या महागाई वरती खासदार बाळू धानोरकर बोलत होते. दरम्यान त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली. म्हणाले, राज्याच्या मंत्रीमंडळात भ्रष्टाचारी, नालायक लोकांचा समावेश आहे.

म्हणाले, मंत्री भ्रष्टचारी असले तरी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सर्वांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळं जन्माला यायचं असेल तर ब्राह्मणांच्याच पोटी यावं. आज ब्राम्हणांची पोर खारिक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

तसेच म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार हे लुटारू सरकार असून, २०२४ च्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आजादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे.

नऊ ऑगस्ट पासून निघालेली ही यात्रा आज १३ ऑगस्ट रोजी वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहचली. यावेळी संबोधित करताना खासदार बाळू धानोरकर बोलत होते. यावेळी, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now